For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी

06:53 AM May 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सध्या सुरू असलेल्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे होणाऱ्या आरसीबी विरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत खेळू शकणार नाही. या स्पर्धेत पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघाने तिसऱ्यांदा षटकांची गती न राखण्याचा गुन्हा केल्याने कर्णधार पंतवर या स्पर्धेच्या शिस्तपालन समितीने एक सामन्याची बंदी घातली आहे. या निर्णयामुळे तो रविवारच्या सामन्यात आरसीबी विरुद्ध खेळू शकणार नाही. त्याचप्रमाणे कर्णधार पंतला 30 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

येथे 7 मे रोजी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला षटकांची गती राखता आली नाही. दिल्लीने हा सामना 20 धावांनी जिंकला होता. यापूर्वी दिल्ली संघाकडून असे गुन्हे 31 मार्च रोजी झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या सामन्यात तसेच 3 एप्रिल रोजी झालेल्या कोलकात्ता नाईट रायडर्सच्या सामन्यात झाले होते. या संघाकडून तिसऱ्यांदा हा गुन्हा नोंदविला गेल्याने आयपीएलच्या नियमानुसार संबंधित संघाच्या कर्णधारावर एक सामन्यासाठी बंदीची तरतूद करण्यात आली आहे. दिल्ली संघातील इतर खेळाडूंनाही त्यांना मिळणाऱ्या मानधन रकमेतील (12 लाख रु.) 50 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावे लागणार आहे. आयपीएलच्या गुणतक्त्यात दिल्लीचा संघ सध्या पाचव्या स्थानावर असून आरसीबी सातव्या स्थानावर आहे. स्पर्धेच्या प्लेऑफ फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी या दोन्ही संघामध्ये रविवारच्या सामन्यात विजयासाठी अधिक चुरस राहील.

Advertisement

Advertisement
Tags :

.