वडाप रिक्षाचालकांची रिक्षा बंद; पिरनवाडी येथे आंदोलन
12:09 PM Dec 06, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
पोलिसांनी तोडगा काढून मोर्चा न काढण्याची विनंती
Advertisement
वार्ताहर/मजगाव
Advertisement
पिरनवाडी येथे वडाप रिक्षाचालकांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकांत रिक्षा बंद आंदोलन छेडण्यात आले. शुक्रवार दि. 5 रोजी सायंकाळी ग्रामीण भागातील रिक्षाचालकांनी अचानक रिक्षा बंद ठेवून खानापूर रोड महामार्गावरील छ. शिवाजी महाराज चौकात बहुसंख्येने एकत्र येवून शहरी रिक्षाचालक यांच्या विरोधात मोर्चा काढणार होते. सुमारे सायंकाळी 5 ते 6 दरम्यान ग्रामीणचे एएसआय माळगी व लक्कण्णावर यांनी तोडगा काढून मोर्चा न काढण्याची विनंती करून सदर मोर्चा रद्द करण्यात आला. ग्रामीचे वडाप रिक्षाचालक व शहरी रिक्षाचालक पॅसेंजर घेण्याबाबत वादविवाद झाल्याने सदर रिक्षावाले मोर्चाच्या तयारीत होते. यावेळी एएसआय माळगी व एएसआय लक्कण्णावर यांनी मध्यस्थी केल्याने मोर्चा स्थगित झाल्याचे सांगण्यात आले.
Advertisement
Next Article