महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यात आज क्रांतिदिन

01:21 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनेक कार्यक्रमांचे आयोजन: राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा

Advertisement

पणजी : गोवा क्रांतिदिन आज मंगळवार दि. 18 जून रोजी सकाळी 8.45 वा. पणजीतील आझाद मैदानावर साजरा करण्यात येणार आहे. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, नागरिक तसेच मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे हजेरी लावणार असून पावसाचे दिवस असल्याने आझाद मैदानात खास मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई तसेच डॉ. सावंत यांनी क्रांतिदिनानिमित्त गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पिल्लई संदेशात म्हणतात की, 18 जूनची क्रांती ऐतिहासिक असून त्यासाठी गोमंतकीय जनता तसेच स्वातंत्र्यसैनिकांना माझ्या शुभेच्छा आहेत.त्यांच्या त्यागामुळेच ही क्रांती घडून आली.

Advertisement

डॉ. सावंत यांनी 18 जून 1946 च्या ऐतिहासिक गोवा क्रांतिदिनाची आठवण कऊन दिली. त्याच दिवशी पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात डॉ. राम मनोहर लोहिया यांनी आवाज उठवला आणि आंदोलनाची ठिणगी पडली. त्यांनी गोव्यातील लोकांना पोर्तुगिजांच्या विरोधात लढण्याचा संदेश दिला. त्या संदेशातूनच गोमंतकीय जनतेच्या हृदयात गोवा मुक्तीसाठी आंदोलन करण्याची ज्योत पेटली. त्यातूनच गोमंतकीयांनी पोर्तुगिजांविरोधात बंड पुकारले.हजारो गोमंतकीय एकत्र आले आणि त्यांनी पोर्तुगीज हुकूमशाही राजवटीविरोधात लढाई सुरू केली. शेवटी 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाल्याचे डॉ. सावंत यांनी संदेशात म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article