महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नवउद्योजकांना ‘पीएमईजीपी’ योजनेची संजीवनी

10:52 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वर्षभरात 361 लघू उद्योगांना मंजुरी : कर्जासह अनुदानही बँक खात्यात : 50 लाखापर्यंतचे कर्ज देण्याची तरतूद

Advertisement

सुशांत कुरंगी /बेळगाव

Advertisement

युवा पिढीला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून लघु उद्योगांना कर्ज पुरवठा तसेच अनुदान दिले जाते. प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम (पीएमईजीपी) योजना बेळगाव जिल्ह्यातील लघु उद्योजकांना फायद्याची ठरली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 361 लघु उद्योगांना जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) ने मदतीचा हात दिल्याने अनेक उद्योग उभे राहिले. त्यामुळे पीएमईजीपी ही योजना बेळगावमधील तरुणाईसाठी संजीवनी ठरत आहे. शहरांसह ग्रामीण भागातील उद्योगांना बळ मिळावे व बेरोजगारीचा प्रश्न सुटावा यासाठी पीएमईजीपी योजना राबविली जाते. खेड्यांमधून शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्यामुळे हे थांबविण्यासाठी ग्रामीण भागातून तरुणाईला लघु उद्योग उपलब्ध करून दिले जात आहेत. खाद्यपदार्थ तयार करणे, शेतीवर आधारित उद्योग, दुग्ध उत्पादने, कुक्कुट पालन अशा व्यवसायांना सवलतीच्या दरात कर्जपुरवठा केला जात असल्याने ग्रामीण भागातच उद्योग सुरू करणे सहज शक्य होत आहे.

जिल्ह्यातून 1200 हून अधिक अर्ज

बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लघु उद्योग स्थिरावले आहेत. औद्योगिक वसाहती आजूबाजूस असल्याने लघु उद्योगांना बळ मिळत आहे. 2023-24 या वर्षात डीआयसीकडे पीएमईजीपी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 1265 अर्ज दाखल करण्यात आले होते. डीआयसीकडे अर्ज केले असले तरी बँकांकडून उद्योगाची सर्व माहिती घेतली जाते. प्रोजेक्ट रिपोर्टनुसार उद्योगाची व्याप्ती पाहूनच कर्ज मंजुरी दिली जाते. बँकांच्या सहकार्याने यावर्षी 361 उद्योगांना अंतिम मंजुरी देण्यात आली. उद्योगांच्या व्याप्तीनुसार 50 लाखापर्यंतचे कर्ज देण्याची तरतूद या योजनेतून करण्यात आली. पीएमईजीपी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला एकूण कर्जापैकी 10 टक्के रक्कम स्वत: खर्च करावी लागते. उर्वरित 90 टक्के रक्कम कर्ज रुपाने दिली जाते. इतर प्रवर्गातील नागरिकांना 95 टक्के कर्ज देण्यात येते. ग्रामीण भागातील उद्योगांना 35 टक्के अनुदान दिले जाते. शहरी भागातील उद्योगांना 25 टक्के अनुदान दिले जाते. उद्योगानुरुप अनुदानामध्ये बदल होत जातो. राष्ट्रीयकृत बँकांसह सहकारी बँकांही या योजनेसाठी 7 ते 10 टक्क्यांनी कर्ज पुरवठा करतात.

अर्ज स्वीकृती सुरू

बेळगावमधील उद्यमबाग येथील जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) मार्फत पीएमईजीपी योजनेची अंमलबजावणी केली जाते. पीएमईजीपी या वेबसाईटवर या योजनेची सर्व माहिती देण्यात आली आहे. जून महिन्यापासून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्ज स्वीकृती सुरू करण्यात येत आहे. नवउद्योजकांनी उद्योग उभारण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी उद्यमबाग येथील डीआयसी केंद्राला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे

या उद्योगांना मिळते कर्ज सवलत

सवलतीच्या दरात कर्जपुरवठा

लघु उद्योगांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएमईजीपी योजना सुरू आहे. नवीन उद्योग सुरू करताना उद्योगांना कार्यक्षमतेनुसार कर्जपुरवठा तसेच अनुदान दिले जाते. 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 361 लघु उद्योगांना बँकांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात कर्जपुरवठा व अनुदान मिळवून देण्यात आले. याचबरोबर राज्य सरकारच्या योजनेतून उद्योग सुरू करण्यासाठी 25 ते 35 टक्क्यापर्यंत अनुदान दिले जाते.

- सत्यनारायण भट (सहसंचालक, जिल्हा उद्योग केंद्र)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article