महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘नीट-युजी’चा सुधारित निकाल जाहीर

06:30 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे गुणांकन बदलले

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नीट-युजी 2024 चे सुधारित स्कोअर कार्ड जारी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एजन्सीने ‘नीट-युजी’चा सुधारित निकाल दिला आहे. या निकालात 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे गुणांकन बदलल्याचे दिसून येत आहे. सुधारित निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. आता वैद्यकीय समुपदेशन समिती लवकरच नीट-युजी समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करेल. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण तीन फेऱ्यांमध्ये समुपदेशन होणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील प्रक्रिया पार पडणार आहेत. समुपदेशनाचे वेळापत्रकही या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश परीक्षेत विचारलेल्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नाचा चौथा पर्याय योग्य मानून नवीन गुणवत्ता यादी जाहीर करण्याचे आदेश दिले होते. ‘नीट-युजी’चा निकाल यापूर्वी 4 जून रोजी जाहीर झाला होता. ज्यामध्ये 67 उमेदवार 720 पैकी 720 गुण मिळवून अव्वल ठरले. पण यानंतर नीट-युजी वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. ज्यामध्ये ग्रेस मार्क्सचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता.

Advertisement
Tags :
###tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article