महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रलंबित विकासकामांचा खासदारांकडून आढावा

11:45 AM Oct 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : बेळगाव विमानतळाच्या विकासासंबंधीही चर्चा

Advertisement

बेळगाव : रेल्वे, विमानतळ, रिंगरोड व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासंबंधीच्या प्रलंबित कामांचा बुधवारी खासदार जगदीश शेट्टर यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदारांनी वरील कामांच्या प्रगतीविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह नैर्त्रुत्य रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेऊन खासदारांनी त्यांचा आढावा घेतला.

Advertisement

बेळगाव-कित्तूर-धारवाड नूतन रेल्वेमार्गासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया, बेळगाव येथे उभारण्यात येणारे रेल्वे उड्डाणपूल, रिंगरोडविषयी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांकडून भूसंपादनाविषयी माहिती घेऊन निर्धारित वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना खासदारांनी केली. बेळगाव-हुनगुंद-रायचूर या मार्गाविषयीही माहिती घेण्यात आली. याच बैठकीत बेळगाव विमानतळाच्या विकासासंबंधी चर्चा झाली. सध्या उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांविषयी खासदारांनी माहिती घेतली. कित्तूर परिसरात औद्योगिक कारणासाठी भूसंपादन प्रक्रियेला विलंब का होत आहे? याविषयी चर्चा करून त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना जगदीश शेट्टर यांनी केली.

तानाजी गल्ली उड्डाणपुलाबाबत पुनर्विचाराचे आश्वासन

तानाजी गल्ली रेल्वेगेटनजीक उड्डाणपूल उभारण्यास नागरिकांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे याबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी पहिले, दुसरे व तिसरे रेल्वेगेट, तसेच तानाजी गल्लीजवळ उड्डाणपूल उभारण्याबाबत बोलाविण्यात आलेल्या बैठकीत नागरिकांनी उड्डाणपुलाला विरोध दर्शविला. तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, फुलबाग गल्ली येथील नागरिकांनी व पंचमंडळींनी उड्डाणपूल उभारण्यास तीव्र आक्षेप घेतला. हवे तर रेल्वेगेटच्या बाजूंनी भिंत उभी करावी. परंतु पूल उभारू देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्याला खासदार शेट्टर यांनी मान्यता दर्शविली. या बैठकीस विनोद भागवत, बाळासाहेब कग्गणगी, इंद्रजित पाटील, बंडू व राजू भातकांडे, रवि हुलजी यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. स्थानिक नागरिकांच्या मागणीचा विचार करून पूल उभारला नाही तर कोणत्या गैरसोयी होणार आहेत, याविषयी चर्चा झाली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article