For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिलारी घाटात पर्यटकांची कार 100 फूट दरीत कोसळून अपघात

03:08 PM Jan 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
तिलारी घाटात पर्यटकांची कार 100 फूट दरीत कोसळून अपघात
Advertisement

सर्वजण गंभीर जखमी

Advertisement

(साटेली भेडशी प्रतिनिधी)

गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या कर्नाटक मधील पर्यटकांच्या खासगी कारला तिलारी घाटात मोठा अपघात झाला. या अपघातात कारमधील सर्वजण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना बेळगाव येथे हलविण्यात आले आहे.हा अपघात गुरुवारी सकाळी झाला. गोव्याहून तिलारी घाट मार्गे बेळगाव कर्नाटक गाठत असताना त्यांची कार (के ए 02 एम एन 2906) तिलारी घाटात पोहचली असता एका वळणदार रस्त्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व समोरच्या दगडाला कार आदळली.ही कार आदळल्यानंतर तिथून पुन्हा मागच्या रस्त्यावर जवळपास 100 ते 120 फूट खाली कोसळली.यात कारचेही मोठे नुकसान होत कारमधील सगळेजण रस्त्यावर गंभीर जखमी झाले आहेत.अपघातानंतर घाटरस्त्यातुन जात असणाऱ्या इतर प्रवाशी वाहनधारकांनी जखमींना मदतकार्य करून उपचारासाठी बेळगाव येथे हलविले.अपघातस्थळी रस्त्यावर मोठा रक्तस्राव झाला आहे.कारचाही चक्काचूर झाला आहे. या अपघाताबाबत चंदगड पोलीस ठाण्याची संपर्क साधला अपघाताबाबत नोंद करण्यात आलेली नसून अपघातग्रस्त कार घटनास्थळी एका बाजुला काढून ठेवण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.