For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पश्चिम घाटातील प्रकल्पांमध्ये अटींच्या पालनासंबंधी आढावा घ्या

11:01 AM Nov 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
पश्चिम घाटातील प्रकल्पांमध्ये अटींच्या पालनासंबंधी आढावा घ्या
Advertisement

मंत्री ईश्वर खंड्रे यांची वन खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

बेंगळूर : पश्चिम घाटात निर्माण करण्यात येणारे रस्ते आणि इतर प्रकल्पांमध्ये शर्तींचे पालन केले जात आहे की नाही, याचा आढावा घेण्याचे निर्देश वन आणि पर्यावयण मंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिले आहेत. बेंगळूरमधील अरण्य भवन येथे बुधवारी पार पडलेल्या वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या चौथ्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पश्चिम घाट भागात शिरुरसह अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. डोंगर 90 अंश कोनात कापण्याऐवजी 45 अंश कोनात कापल्यास दरड कोसळ्याच्या घटना रोखता येऊ शकतात, असे ते म्हणाले. जंगले, वनोद्यानातील कोणत्याही प्रकल्पांना परवानगी देताना वन्यजीवांना त्रास होऊ नये यासाठी जोखीम कमी करण्याच्या उपाययोजनांसह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

चामराजनगर जिल्ह्यातील हनुर मतदारसंघाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या 291 लोकवस्ती प्रदेशांना पाणीपुरवठा कनेक्शन देण्याच्या प्रस्तावावर वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी 4.4573 हेक्टर वनप्रदेश सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूरमध्ये बिबट्या संवर्धन वनोद्यात स्थापनेबाबत प्रस्तावित स्थळाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कारवारच्या होन्नावर तालुक्यातील हिरेबैल परिसरातील अंदबळ्ळी व इतर 5 गावांतील 325 घरांना तसेच होन्नावर शहर व मार्गावरील 5 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा पाईपलाईन योजना विस्ताराचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

Advertisement

तीन बछड्यांचा फोटो-व्हिडिओ : सीआयडी चौकशीचे आदेश

चामराजनगर जिल्ह्यातील बीआरटी व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील बेडगुळी येथे काही जणांनी वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशझोतात वाघाच्या तीन बछड्यांचा फोटो आणि  व्हिडिओ बनवला आहे. वाघिणीच्या मृत्यूच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी याबाबत वनखात्याच्या अप्पर मुख्य सचिवांना लेखी सूचना दिली आहे. एनजीआंsना मिळणाऱ्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोपही आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविणे योग्य असल्याचे ईश्वर खंड्रे यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.