महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रेवंत रेड्डीनी घेतली सोनिया गांधींची भेट

06:44 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री : राहुल गांधी अन् प्रियांका वड्रांसोबत चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री रेवंत रेड्डीr यांची भेट घेतली आहे. यादरम्यान राहुल यांनी रे•ाr यांचे तेलंगणातील विजयासाठी अभिनंदन केले आहे. रेवंत रेड्डीr यांच्या नेतृत्वात काँग्रेस सरकार तेलंगणातील लोकांसाठी स्वत:च्या सर्व गॅरंटी पूर्ण करणार आणि प्रजा सरकार आणणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. रेवंत रेड्डी हे आज तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

शपथविधी सोहळ्यापूर्वी रेवंत रेड्डी हे बुधवारी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी येथे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. या सोहळ्यात सोनिया गांधी उपस्थित राहू शकतात असे मानले जात आहे.

तर तेलंगणाच्या मुख्य सचिव ए. शांति कुमारी यांनी अधिकाऱ्यांना एलबी स्टेडियममध्ये होणाऱ्या रेवंत रेड्डीr यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत मुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यासंबंधी केल्या जाणाऱ्या तयारींचा आढावा घेतला आहे. पोलीस विभागाला वाहतूक, पार्किंग आणि सुरक्षेची चोख व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

या बैठकीत पोलीस महासंचालक रवि गुप्ता, हैदराबाद पोलीस आयुक्त संदीप शांडलिया, विशेष मुख्य सचिव सुनील शर्मा, प्रमुख सचिव एस.ए.एम. रिझवी, शैलजा रामय्यर, राज्यपालांचे सचिव सुरेंद्र मोहन, जीएडी सचिव शेषाद्री सामील झाले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत रेवंत रे•ाr यांनी मलकाजगिरी मतदारसंघात विजय मिळविला होता. तर अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ते कोडांगल आणि कामारे•ाr मतदारसंघात उभे राहिले होते. यातील कामारे•ाr मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article