For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केसीआर विरोधात काँग्रेसकडून रेवंत रेड्डी

05:00 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
केसीआर विरोधात काँग्रेसकडून रेवंत रेड्डी
Advertisement

कामारेड्डी मतदारसंघ ठरला लक्षवेधी

Advertisement

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वत:च्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत तेलंगणा काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार रेवंत रेड्डीयांचे नाव सामील आहे. रेवंत रेड्डी हे बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत. रेड्डी आणि राव हे दोघेही प्रत्येकी दोन मतदारसंघांमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

रेवंत रेड्डी हे कामारेड्डी मतदारसंघात राव यांना आव्हान देणार आहेत. याचबरोबर ते कोडंगल मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार आहेत. याच मतदारसंघातून रेड्डी यांनी 2018 मध्ये निवडणूक लढविली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यानंतर लोकसभा निवडणुकीत विजयी होत ते खासदार झाले होते. तर केसीआर हे गजवेल या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत.

Advertisement

 केसीआर विरोधात राजेंद्र

मुख्यमंत्री केसीआर हे गजवेल मतदारसंघात निवडणूक लढवत असून येथे त्यांचा सामना माजी सहकारी एटाला राजेंद्र यांच्याशी होणार आहे. राजेंद्र हे मंत्रिपदावरून हटविण्यात आल्यावर भाजपमध्ये सामील झाले होते. राजेंद्र देखील दोन विधानसभा मतदारसंघांमधून स्वत:चे भवितव्य आजमावत आहेत. हुजूराबाद मतदारसंघातूनही ते निवडणूक लढवित आहेत. याच मतदारसंघातून त्यांनी यापूर्वी बीआरएस तसेच भाजप दोन्ही पक्षांच्या तिकिटावर विजय मिळविला आहे.

काँग्रेसकडून उमेदवारांमध्ये बदल

उमेदवारांच्या तिसऱ्या यादीत काँग्रेसने दोन उमेदवार बदलले आहेत. माजी मंत्री जी. चिन्नारेड्डी यांच्या जागी वानापर्थी मतदारसंघात तुदी मेघा रेड्डी काँग्रेस उमेदवार असतील. तर बोथ मतदारसंघात वेन्नला अशोक यांच्याजागी एडी गजेंद्र हे पक्षाचे उमेदवार आहेत. काँग्रेसकडून अद्याप 5 उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत. यातील 1 किंवा दोन जागा भाकपसाठी सोडल्या जाऊ शकतात. काँग्रेसने स्वत:च्या तीन खासदारांना उमेदवारी दिली आहे.

Advertisement
Tags :

.