महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील कपातीची रक्कम परत करा ! पालकमंत्र्यांच्या बँक अधिकाऱ्यांना सूचना
04:43 PM Sep 11, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement
कोल्हापूर प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजनेंतर्गत जिह्यातील अनेक लाभार्थी महिलांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम ‘मिनिमम बॅलन्स‘च्या नावाखाली तसेच इतर कारणांसाठी बँकांनी कपात करु नये अशा सूचना देवून सर्व बँकांनी कपातीची रक्कम तातडीने परत करावी, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व बँक प्रतिनिधींना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजनेतील लाभार्थ्यांची ‘मिनिमम बॅलन्स सह अन्य कारणांनी कपात केलेली रक्कम बँकांनी परत द्यावी. काही बँकांनी कपातीची रक्कम परत केली असून ज्या बँकांनी अद्याप ही रक्कम परत केलेली नाही त्या सर्व बँकांनी तातडीने कपातीची रक्कम परत करावी.
या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना या महिन्यातही नोंदणी करता येणार असून 30 सप्टेंबरपर्यंत पात्र महिलांनी नोंदणी करावी. या महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांचा अर्ज पात्र ठरला, तर त्यांना जुलै पासून तीन महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या महिलांच्या बँक खात्याचे आधार सिडिंग झालेले नाही, ती प्रक्रियाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचन बँक प्रतिनिधींना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा अग्रणी बँकेचे गणेश गोडसे तसेच इतर सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement