For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मानवजीत, मोदगिलचे पुनरागमन

12:39 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
मानवजीत  मोदगिलचे पुनरागमन
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अव्वल नेमबाज मानवजीतसिंग संधू आणि अंजुम मोदगिल यांचे राष्ट्रीय संघामध्ये पुनरागमन झाले आहे. पुढील महिन्यात जकार्ता आणि कुवेत शहरामध्ये होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्र फेरीच्या स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करतील.

इंडोनेशियातील जकार्ता येथे 5 ते 18 जानेवारी दरम्यान रायफल आणि पिस्तुल नेमबाजी प्रकार घेतले जातील तर कुवेत शहरात 12 ते 23 जानेवारी दरम्यान शॉटगन नेमबाजी प्रकार होणार आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी भारताने 20 सदस्यांचा संघ निवडला आहे. रायफल पिस्तुल प्रकारासाठी 20 नेमबाज तर शॉटगन प्रकारासाठी 12 नेमबाजांचा समावेश राहिल. पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी एकूण 16 नेमबाजांचा कोटा ठेवण्यात आला आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या 13 नेमबाजांनी कोटा पद्धतीनुसार आपले तिकिट निश्चित केले आहे.

Advertisement

जकार्तामध्ये होणाऱ्या स्पर्धेत पिस्तुल नेमबाज गुरप्रित सिंग, पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात श्री कार्तिक शबरी राज, पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात उज्ज्वल मलिक, महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत भव्या त्रिपाठी पहिल्यांदाच वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. तिलोत्तमा सेन, श्रीयांका सदनगी, भोवनीश मेंडीरेटा यांचाही संघात समावेश आहे.

Advertisement
Tags :

.