महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवृत्त सेनाधिकाऱ्याची काश्मीरमध्ये हत्या

06:22 AM Feb 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोळीबारात पत्नीसह मुलगी जखमी; कुलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला

Advertisement

वृत्तसंस्था/ अमृतसर

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सोमवारी निवृत्त लान्स नाईक यांच्या कुटुंबावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दक्षिण काश्मीरमधील बेहीबाग भागात घडलेल्या या घटनेच्या वेळी माजी सैनिक त्याच्या गाडीतून खाली उतरत होता. या हल्ल्यात त्यांची पत्नी, मुलगी आणि अन्य एक नातेवाईकही जखमी झाले. गोळीबारानंतर सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, माजी सैनिकाचा मृत्यू झाला.

माजी सेनाधिकाऱ्यावर केलेल्या गोळीबारानंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराला वेढा घालण्यात आला आहे. सुरक्षा दल हल्लेखोरांचा शोध घेण्यात व्यग्र आहेत. हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्यासाठी सुरक्षा दल प्रयत्न करत आहेत. दुपारी 2:45 वाजता दहशतवाद्यांनी निवृत्त लान्स नाईक मंजूर अहमद यांच्या कुटुंबावर गोळीबार केला. या गोळीबारात अहमद, त्यांची पत्नी आयना आणि मुलगी सायना जखमी झाले. तिघांनाही श्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान मंजूर अहमदचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी आणि मुलीवर उपचार सुरू आहेत.

हल्ल्यानंतर माजी सैनिकाच्या पोटात गोळी लागल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांची पत्नी आयना अख्तर आणि मुलगी सायना हिच्या पाय आणि हातांना गोळ्या लागल्या आहेत परंतु त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मृत झालेले निवृत्त लान्स नाईक मंजूर अहमद हे 162 टेरिटोरियल आर्मी (टीए) मध्ये तैनात होते. सुमारे पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर आपल्या मूळ गावी राहत होते.

2025 मधील पहिला दहशतवादी हल्ला

सोमवारी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यावर झालेला हा हल्ला 2025 सालचा काश्मीर खोऱ्यातील पहिला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुरक्षा दल या घटनेशी संबंधित सर्व पैलूंचा सतत तपास करत आहेत आणि हल्लेखोरांना पकडण्यासाठी कारवाई करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article