'होळी एकतेचे रंग अधिक दृढ करेल' पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा
दिल्ली
देशभरात आज रंगांचा उत्सव उत्साहात सादरा केला जातो. एकमेकांवर रंगांनी उधळण करत हा उत्सव देशभरात अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'च्या ऑफीशियल हॅण्डेलवरून सर्वांना होळी शुभेच्छा दिल्या आहेत.
या पोस्टमध्ये, "तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा. आनंदाने भरलेला हा पवित्र सण, प्रत्येकाच्या जीवनात नवीन उत्साह आणि ऊर्जा भरून काढेल आणि देशवासीयांमध्ये एकतेचा रंग अधिक दृढ करेल अशी आमची आशा आहे." अशी भावना व्यक्त केली.
याशिवाय देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त त्यांनी आपल्या संदेशात म्हणतात, रंगाचा सण असलेल्या या होळी सणाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा. हा सण एकात्मता आणि प्रेमाचा संदेश देतो. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा हा सण प्रतिक आहे. या पावन पर्वानिमित्त आपण भारत मातेची सर्व मुलं एकत्र येऊन समृद्ध आणि प्रगतीशील जीवनासाठी कटीबद्ध आहोत.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स च्या ऑफीशियल हॅण्डेलवरून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीच्या पावन पर्वाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. आनंद आणि उत्साहाचे प्रतिक असलेला हा सण तुमच्या जीवनात आनंदाचे आणि आरोग्याचे रंग घेऊन येवो. आनंदी आणि सुरक्षित होळीसाठी शुभेच्छा, असे संरक्षणमंत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.