बलगवडेतील निवृत्त सैन्य़ अधिकाऱ्याची हत्या पैशासाठी! संशयिताची कबुली
मांजर्डे वार्ताहर
तालुक्यातील डोर्ली फाटा बलगवडे येथे राहण्राया लष्करातील निवृत्त अधिकारी गणपती शिंदे यांचा बुधवारी रात्री लोखंडी रॉडने मारहाण करून खून करण्यात आला होता. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताच्या शोधासाठी एलसीबीची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली होती.
समांतर तपासा दरम्यान घटनास्थळाचें निरीक्षण आणि इतर गोपनीय मा†हतीच्या आधारे गावातीलच वैष्णव विठ्ठल पाटील वय 19 याच्या हालचाली बाबत संशय निर्माण झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तपास करीत असताना संशयित वैष्णव पाटील हा मौजे देवगाव तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथे असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर तिथे जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर संशयीताकडे तपास केला असता त्याने मयत शिंदे यांची चार चाकी स्विफ्ट डिझायर गाडी विकून पैसे मिळवायचे, व मयत शिंदे यांनी ती परत मागू नये या कारणास्तव खून केल्याचे कबूली दिलेली आहे. तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, पोलीस हवालदार सागर टिंगरे, दर्याप्पा बंडगर अरूण पाटील सतीश माने, पोलीस नाईक, प्रकाश पाटील, सोमनाथ गुंडे, सतीश नलावडे, सुरज थोरात, आ†भजीत ठाणेकर, विनायक सुतार, रोहन गस्ते, पॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अमरसिंह सूर्यवंशी, सयाजी पाटील, प्रशांत चव्हाण, सुहास खुबीकर, विवेक यादव, विठ्ठल सानप, यांनी या प्रकरणी तपास करून कारवाई केली आहे.