जुलैमध्ये वाहनांची किरकोळ विक्री घटली
फाडाची माहिती : वर्षाच्या आधारे 8 टक्क्यांची घसरण
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
प्रवासी वाहने, दुचाकी वाहने आणि टॅक्टर यांच्या नोंदणींमध्ये घसरण आली आहे. जुलै महिन्यात वाहनांची किरकोळ विक्री वर्षाच्या आधारे जवळपास 8 टक्क्यांनी घटली आहे. वाहन डिलर्सनी दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी सांगितली आहे.
मागील महिन्यामध्ये वाहनांची एकूण विक्री ही 14,36,927 युनिटवर राहिली आहे. जी जुलै 2021 मध्ये 15,59,106 युनिट राहिली होती. प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री जुलै 2022 मध्ये वर्षाच्या आधारे जवळपास 5 टक्क्यांनी घसरुन 2,50,972 होती, तर हाच आकडा जुलै 2021 मध्ये 2,63,238 राहिला असल्याचे फाडाने स्पष्ट केले आहे.
नवे मॉडल्समध्ये वाढः गुलाटी
जुलैमध्ये विक्रीचा आकडा भलेही घटला असेल परंतु वाहनांची नवनवीन मॉडेल्स वेगाने बाजारात उतरवली जात आहेत. विशेष म्हणजे कॉम्पॅक्ट एसयूव्ही शेणीमध्ये वृद्धीला मदत मिळत असल्याचे फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी म्हटले आहे.
फाडाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार मागील दोन महिन्यात वाहनांची किरकोळ विक्री ही 11 टक्क्यांनी घटून 10,09,574 युनिटवर राहिली आहे. हाच आकडा मागील एक वर्षाच्या समान कालावधीत 11,33,344 युनिट राहिल्याची माहिती आहे.