महिंद्राच्या एसयुव्ही इलेक्ट्रीक कार्स अखेर लाँच
18 लाखाच्या पुढे असणार किमत : 682 किलोमीटरचे मायलेज
नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी महिंद्राने अखेर आपल्या बहुचर्चित इलेक्ट्रीक एसयुव्ही कार्स भारतीय बाजारात उतरवल्या आहेत. बीई 6 इ व एक्सइwव्ही 9 इ या एसयुव्ही कार्स महिंद्रा आणि महिंद्रा यांनी लाँच केल्या आहेत. या दोन्ही कार्सच्या किमती अनुक्रमे 18.9 लाख रुपये, 21.9 लाख रुपये इतक्या असणार आहेत. या गाड्यांच्या बुकिंगला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे. गाड्या कोणत्या आणि त्यांची वैशिष्ट्यो पाहुया.
महिंद्रा बीई 6 इ
ही गाडी 59 केडब्ल्यूएच आणि 79 केडब्ल्यूएच क्षमतेच्या बॅटऱ्यांसोबत येणार आहे. सदरची गाडी एआरएआय प्रमाणीत आधारावर 682 किलोमीटरचे मायलेज देते, असा दावा कंपनीचा आहे. त्याशिवाय सदरच्या गाडीची बॅटरी 20 ते 80 टक्के इतकी चार्ज होण्याकरीता केवळ 20 मिनीटांचा अवधी लागतो. या गाडीत मल्टी झोन क्लायमेट कंट्रोल, थ्री ड्राइव्ह मोडस्, वायरलेस फोन चार्जिंग, ड्युअल 12.3 इंचाचा फ्लोटिंग स्क्रीन, पॅनारोमीक सनरुफ, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी अशी वैशिष्ट्यो असणार असून 7 एअरबॅग्जही सोबत असतील.
महिंद्रा एक्सइव्ही 9 इ
या गाडीत 59 केडब्ल्यूएचची बॅटरी असणार असून 656 किलोमीटरचे मायलेज गाडी देईल असा दावा कंपनीकडून केला जात आहे. 20 ते 80 टक्के इतकी बॅटरी 20 मिनीटात चार्ज होईल, असेही कंपनी म्हणते आहे. फ्लॅट बॉटम स्टीअरिंग व्हील, पॅनारोमीक सनरुफ, 360 डिग्री कॅमेरा, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, थ्री स्क्रीन्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 16 स्पीकर हार्मन कारडॉन म्युझिक सिस्टीम या वैशिष्ट्यांसह या गाडीत 6 एअरबॅग्ज असतील, अशीही माहिती कंपनीने दिली आहे.