कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यातील आठ शाळांचा निकाल शून्य

06:14 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Gurugram: Students search for their roll numbers in the seat allocation sheet before taking Class 12 CBSE board Exam, in Gurugram on Thursday. PTI Photo (PTI3_9_2017_000067B)
Advertisement

निकाल वाढीसाठीचे प्रयत्न अपुरे, खासगी शाळांची प्रगती

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

दहावीचा निकाल सुधारण्यासाठी शिक्षण विभागाकडून नवनवीन उपक्रम राबविले जात असतात. मागील दहा ते पंधरा वर्षात अनेक उपक्रम राबवले तरी बेळगाव  जिल्ह्याची प्रगती काही केल्या झालेली दिसून येत नाही. यावर्षीही 151 शाळांचा निकाल 50 टक्क्यांहून कमी लागला आहे. तर बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील दोन व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 6 शाळांचा निकाल शून्य टक्के लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सरकारी आणि अनुदानित शाळांपैकी 151 शाळांचा निकाल 50 टक्क्यांहून कमी लागला आहे. यामध्ये 67 शाळांचा निकाल 40 टक्क्यांपेक्षा कमी लागल्याचे दिसून येत आहे. बेळगावमधील श्रीनगर येथील लिटल स्कॉलर्स अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, हलभावी येथील मोरारजी देसाई निवासी शाळा, कॅम्प येथील मॉडेल इंग्लीश मीडियम स्कूल तर खानापूर तालुक्यातील मन्सापूर येथील सेंट जोसेफ स्कूलचा 100 टक्के निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सरकारीपेक्षा खासगी शाळांचा निकाल अधिक लागल्याची बाब उघड झाली आहे. 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेल्या 27 शाळा असून त्यामध्ये बहुतांश खासगी शाळा आहेत.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात यावर्षी कित्तूर तालुक्याने आघाडी घेतली. बेळगाव शहर विभागाला मागे टाकत कित्तूर तालुक्याने बाजी मारली. यावर्षी कित्तूर तालुक्याचा 67.89 टक्के इतका निकाल लागला आहे. बेळगाव ग्रामीणचा 54.74 टक्के निकाल लागला असून शैक्षणिक जिल्ह्यात सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. बेळगाव शहराचा 66.56 टक्के इतका निकाल लागला असून खानापूर तालुक्याचा 61.29 टक्के निकाल लागला आहे.

बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातून 74 हजार 435 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 28 हजार 532 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. सर्वात लाजीरवाणी गोष्ट म्हणजे बेळगावमधील 2 तर चिकोडीतील 6 शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहे. त्यात एक जमेची बाजू म्हणजे यावर्षी बैलहोंगल तालुक्यातील देवलापूर येथील सरकारी शाळेची विद्यार्थिनी रोहिणी पाटील ही राज्यात प्रथम आली आहे.

निकाल वाढीसाठी प्रयत्न सुरू

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. एसएसएलसी-2 परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार असून निकाल वाढीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- लीलावती हिरेमठ (जिल्हाशिक्षणाधिकारी)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article