‘भोगपर्व’ पहिले, ‘जनेल’ दुसरे
50 व्या कोंकणी नाट्यास्पर्धेचा निकाल जाहीर
पणजी : कला अकादमी गोवा आयोजित 50 वी कोंकणी नाट्यास्पर्धा 2025-26 चा निकाल जाहीर झाला असून ‘भोगपर्व’ या नाट्याप्रयोगाने यंदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. गिमोणे- डिचोली येथील सियावर राम संस्थेने सादर केलेल्या या प्रयोगाला एक लाख ऊपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘जनेल’ (रसरंग, उगवे) यांना दुसरे तर ‘काणी तशी जूनीच... पूण?’ (श्री सातेरी कलामंच, मोर्ले-सत्तरी) यांना तिसरे पारितोषिक जाहीर झाले. ‘बापू-गांधी’ आणि ‘अस्तुरी’ या दोन प्रयोगांना प्रोत्साहनपर पारितोषिकांनी गौरवण्यात आले आहे.
नाट्याप्रयोग : पारितोषिके पुढील प्रमाणे : प्रथम (रु. 1,00,000/-), ‘भोगपर्व’ सियावर राम, गिमोणे-डिचोली. द्वितीय (रु. 75,000/-), ‘जनेल’ रसरंग, उगव. तृतीय (रु. 50,000/-), ‘काणी तशी जूनीच... पूण?’ श्री सातेरी कलामंच, मोर्ले-सत्तरी, उत्तेजनार्थ बक्षिसे (प्रत्येकी रु. 25,000/-) ‘बापू-गांधी’ अंत्रुज घुडयो, बांदोडा फोंडा आणि ‘अस्तुरी’, दी हाउसिंग बोर्ड कॉलनी रेसिडेन्स असोसिएशन, साखळी यांना प्राप्त झाले आहे.
दिग्दर्शन : प्रथम : (रु. 10,000/-), अश्वेश अशोक गिमोणकर, भोगपर्व, द्वितीय : (रु. 7,000/-), नीनलेश महाले, जनेल, तृतीय : (रु. 5,000/-) शाबलो श्रीकांत गांवकार, काणी तशी जूनीच... पूण?
अभिनय : पुरुष : प्रथम : (ऊ. 7,000/-) रघुनाथ साकोर्डेकार बापू-गांधी. द्वितीय : (ऊ. 5,000/-) रामा गावस, आदमिनिस्त्रदोर, होमखण.
प्रमाणपत्रे : विश्वप्रताप पवार, अनिनेश सावंत, चंद्रकांत माजिक, भालचंद्र अनंत नाईक, साईनंद वळवईकर.
अभिनय : स्त्राr : प्रथम : (रु. 7,000/-) दिव्या गावस, सासाय, काणी तशी जूनीच... पूण?, द्वितीय : (रु. 5,000/-) सुविधा तोरगल बखले, भक्ती, बापू-गांधी.
प्रमाणपत्रे : कृत्तिका सुभाष जाण (नयना जाळे), डॉ. वेदिका वाळके (सोनुले, जनेल), अर्पिता गावस (सून, काणी तशी जूनीच... पूण?), संपदा गांवस (अस्तुरी), मनिषा परब (अस्तुरी), तस्लीमा मयेकर (संजीवनी भोगपर्व), चैती कडकडे (मिना हिडोनीस्ट).
मंच मांडणी : (रु. 5,000/-), शैलेश महाले जनेल, प्रमाणपत्र: ज्ञानदिप च्यारी भोगपर्व.
वेशभूषा (रु. 5,000/-), ममता शिरोडकर भोगपर्व, प्रमाणपत्र: दिव्या गावस काणी तशी जूनीच... पूण?
प्रकाश योजना : ( रु. 5,000/-) नीलेश महाले, जनेल, प्रमाणपत्र: अश्वेश अशोक गिमोणकर, भोगपर्व.
रंगभूषा : (रु. 5,000/-) अमिता नायक, जनेल, प्रमाणपत्र: हर्ष नाईक, काणी तशी जूनीच... पूण?
पार्श्वसंगीत : (रु. 5,000/-) प्रसन्न कामत, बापू-गांधी, प्रमाणपत्र: सागर गांवस, भोगपर्व.
नाट्यालेखन : नवीन संहिता : प्रथम : दिले नाही. द्वितीय : पारितोषिक (रु. 7,000/-), युगांक नायक, देश राग रूपांतरित संहिता (रु. 10,000/-), दत्ताराम कामत बांबोळकार, बापू-गांधी. या स्पर्धेचे परीक्षण विजयकुमार कामत, सतीश गवस आणि दीपलक्ष्मी मोघे यांनी केले.