महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यात पीओपी गणेशमूर्ती विक्रीवर निर्बंध

12:08 PM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्य पर्यावरण खात्याच्या कार्यदर्शींचा आदेश : जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिस  गणेशमूर्तींच्या उत्पादनासह विक्री आणि नदी-नाल्यांमध्ये विसर्जन करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. सदर पीओपी गणेशमूर्ती विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश राज्य पर्यावरण खात्याकडून जारी केला आहे. आदेशाची प्रत संबंधित जिह्यांचे जिल्हाधिकारी, जि. पं. कार्यकारी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस अधिकाऱ्यांनाही जारी केली आहे. अनेक वर्षांपासून परंपरेनुसार गौरी गणेश उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पीओपी गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. उत्सवानंतर या गणेशमूर्तींचे नदी-नाले आदी ठिकाणी विसर्जन केले जाते. यामधील विषारी घटकांमुळे जलप्रदूषण होण्याबरोबरच पाण्यातील जलचर प्राण्यांवर याचा परिणाम होत आहे.

Advertisement

प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश

दूषित पाण्यामुळे नागरिकांसह जनावरांना विविध रोगांना सामोरे जावे लागत आहे. कॅन्सरसारखे गंभीर आजार उद्भवत आहेत. पीओपी गणेशमूर्तींमुळे उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन राष्ट्रीय हरित लवादाकडून जलस्रोतांचे संरक्षण व्हावे, पीओपी गणेशमूर्तींवर निर्बंध आणावेत, असा आदेश केंद्राने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला जारी केला आहे. त्यानुसार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण खात्याकडून याची गंभीर दखल घेतली आहे.

अधिकाऱ्यांना सहकार्य करा

राज्यात पीओपी गणेशमूर्ती विक्रीसह उत्पादनाला तसेच नदी व इतर जलस्रोतांच्या ठिकाणी विसर्जन करण्यास निर्बंध घातले आहेत. या संदर्भातील आदेश पर्यावरण खात्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना बजावण्यात आला आहे. आदेशाचे पालन करण्यास जिल्हा प्रशासनाने कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. पोलिसांनीही यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची सूचना आदेशात नमूद करण्यात आली आहे.

राज्यपालांच्या आदेशावरून

या आदेशानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती जप्त कराव्यात. त्या विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद नमूद करून सदर गणेशमूर्तींच्या विक्रीवर निर्बंध घातले आहेत, असे जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. राज्य पर्यावरण खात्याचे कार्यदर्शी बी. एन. प्रवीण यांनी हा आदेश राज्यपालांच्या आदेशावरून जारी केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article