अमन सेहरावत आणि नेहा सांगवान यांच्यावरील बंदी मागे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या महिला मल्ल अमन सेहरावत आणि नेहा सांगवान यांच्यावर यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनने शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता या दोन्ही मल्लांना आगामी होणाऱ्या प्रो रेसलिंग लीग कुस्ती स्पर्धेच्या लिलावात भाग घेता येईल.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमन सेहरावतने कांस्यपदक मिळविले होते. पण गेल्या सप्टेंबर महिन्यात क्रोएशियातील झाग्रेब येथे झालेल्या विश्वकुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेवेळी अमनने अधिक वजनाचा दाखल न दाखवल्यामुळे तिच्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर गेल्या ऑगस्टमध्ये बल्गेरियात झालेल्या कनिष्ठांच्या विश्व कुस्ती स्पर्धेत नेहा सांगवानला अपात्र ठरवून तिच्यावर निर्बंध घालण्यात आले होते. या घटनांनंतर या दोन्ही महिला मल्लांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या.