सर्वप्रकारचे पाणी उपलब्ध असलेले रेस्टॉरंट
रेस्टॉरंटची ओळख तेथील शेफ आणि खाद्यपदार्थांद्वारे निर्माण होते, परंतु एखादे रेस्टॉरंट स्वत:च्या मेन्यूत खाद्यपदार्थांच्या विविधतेसह पाण्याचा वेगळा मेन्यू सादर करत असेल तर काय? ब्रिटनमधील एका प्रेंच-स्टाइल रेस्टॉरंटने हे अनोखे पाऊल उचलून सर्वांना चकित केले आहे.
ब्रिटनच्या नॉर्दर्न इंग्लंडमध्ये असलेले फ्रेंच-स्टाइल रेस्टॉरंट ला पोपोटेने एक वेगळ्या प्रकारचा ट्रेंड सुरू केला आहे. हे देशातील पहिले असे रेस्टॉरंट ठरले आहे, ज्याने ग्राहकांसाठी ‘वॉटर मेन्यू’ सादर केला आहे. ही संकल्पना खासकरून मद्यपान करत नसलेले आणि स्वत:च्या आरोग्याविषयी सजग असलेल्या लोकांसाठी असल्याचे रेस्टॉरंटचे सांगणे आहे. ला पोपोटेचे शेफ डोरन बाइंडर यांच्यानुसार रेस्टॉरंट नेहमीच वाइन मेन्यू सोपवित असते, परंतु वॉटर मेन्यू नॉन-ड्रिंकर्ससाठी नवा अनुभव आहे. ला पोपोटेने पूर्वीच 140 हून अधिक वाइन्स सादर केल्या आहेत, परंतु आता तेथे लोकांना बाटलीबंद पाण्यातही विविधता मिळणार आहे. मेन्यूत 3 प्रकारचे स्टिल वॉटर आणि चार प्रकारचे स्पार्कलिंग वॉटर सामील आहे. याचबरोबर कॉम्प्लिमेंट्री टॅप वॉटरही उपलब्ध असेल.
रेस्टॉरंटचे सह-संस्थापक शेफ जोसेफ रॉलिन्स आणि गॅले रॅडिगन यांना ही कल्पना तीन वर्षांपूर्वी वॉटर सोमेलियर डोरन बाइंडर यांनी सुचविली होती. प्रारंभी त्यांना हा विचार अजब वाटला, परंतु बाइंडर यांनी स्वत:च्या ‘वॉटर बार’मध्ये टेस्टिंग करविले असता त्यांचा दृष्टीकोन बदलला. पाण्याचा फ्लेवर त्यातील मिनरल्सवर निर्भर असतो, ज्याला टीडीएसने (टोट डिझॉल्व्हड सॉलिड्स) मोजले जाते, असे डोरन बाइंडर यांचे सांगणे आहे.
इटलीचे लॉरेटाना स्पार्कलिंग वॉटर केवळ 14 टीडीएसयुक्त आहे. तर फ्रान्सचे विची सेलास्टिन्स सुमारे 3300 टीडीएसपर्यंत पोहोचते. खास बाब म्हणजे पाण्याला खाण्यासोबत पेयर केल्यावर स्वाद बदलत असतो. डिस्टिल्ड वॉटरचा टीडीएस शून्य असतो, हे खिडकी साफ करणे अणि बॅटरीसाठी चांगले असते, परंतु माणसांसाठी बेकार, खरा स्वाद मिनरल्सद्वारे मिळतो, असे बाइंडर यांचे सांगणे आहे. हा वॉटर मेन्यूला सोमेलियर डोरन बाइंडर यांनी तयार केले आहे. यात 3 प्रकारच्या स्टिल वॉटर आणि चार प्रकारच्या स्पार्कलिंग वॉटर आहेत. याच्या किमतीत सुमारे 6.80 डॉलर्सपासून 26 डॉलर्स प्रतिबॉटलपर्यंत जाते.