महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुळे ते वास्को लोकल ट्रेन पूर्ववत सुरू करा

01:10 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

करा कालेवासियांचे रेल्वे स्टेशनवर धरणे आंदोलन, : 3 महिन्यांपासू रेल्वे प्रशासनाचा सुस्त कारभार, विद्यार्थ्यांचे हाल,संतप्त कालेवासियांचा रेल्वे रोकोचा इशारा

Advertisement

धारबांदोडा : कुळे ते वास्को रेल्वे लोकल ट्रेन गेल्या तीन महिन्यापासून बंद आहे. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही ट्रेन पूर्ववत सुरू होत नसल्याने नाराज झालेल्dया कालेवासियांनी काले रेल्वे स्टेशनवर धरणा आंदोलन केले. यावेळी एक निवेदन रेल्वे मास्तरांना सादर करण्यात आले असू ट्रेन सुरू न केल्यास रेल्वे रोकोचा ईशारा देण्यात आला आहे. यावेळी काले पंचायतीचे सरपंच नरेंद्र गावकर, उपसरपंच संगवी नाईक, पंचसदस्य बाबू रेकडो, गंगाराम गावकर, कुळे शिगांव पंचायतीचे सरपंच गोविंद शिगावकर, उपसरपंच नेहा मडकईकर नागरिकांसोबत उपस्थित होते. यावेळी काले पंचायतीचे सरपंच नरेंद्र गावकर म्हणाले की दुपारी 12.30 वा. कुळे येथून वास्को जाणारी ट्रेन व दुपारी 3 वाजता वास्कोहून येणारी ट्रेन गेल्या तीन महिन्यापासून बंद ठेवण्यात आलेल्dया आहेत. यामुळे विद्यार्थ्याचे व कालेतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

Advertisement

 रेल्वे पुर्ववत सुरू करा, अन्यथा रेल्वे रोकोचा इशारा

याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. त्यानुसार आमदार गणेश गावकर यांच्यासोबत रेल्वे अधिकाऱ्याची बैठक झाली होती. या बैठकीत सदर रेल्वे गाड्या लवकारत लवकर सुरू करण्यात येणार आहे असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र अजूनही गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. शिवाय या गाड्या आणखी एक महिन्यानंतर सुरू करण्यात येणार अशी नोटीस रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेली आहे. यामूळे नाराज झालेल्या नारिकांनी रेल्वे स्टेशनवर धरण आंदोलन करण्याचे निर्णय घेतला. पुन्हा एक निवेदन रेल्वे मास्तरांना सादर करण्यात आले असून लवकारत लवकर गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. तसे न झाल्यास नाईलाजाने रेल्वे रोको करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे, असे ते म्हणाले.  कुळे पंचायतीचे सरपंच गोविंद शिगांवकर यांनी सांगितले की कुळेहून दुपारच्या वेळी सुटणारी ट्रेन बंद असल्याने कुळे भागातील नागरिक व विद्यार्थ्याची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही रेल्वे लवकारत लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. सदर गाडया सुरू केल्या नाहीत तर कुळे तही रेल्वे स्टेशनवर धरणे आंदोलन करण्याचा ईशारा त्यांनी दिला.

कालेवासिय व विद्यार्थ्यांचे हाल, कुळे ते वास्को रेल्वे सुरू करा!

वास्तविक रेल्वे दुपदरीकरण करतेवेळी कालेवासियांकडून महत्वाच्या तीन मागण्या रेल्वे विभागाकडे दिल्या होत्या. मात्र त्या अजून पुर्ण झालेल्या नाहीत. रेल्वे दुपदरी करण्यासाठी कालेतील अनेक नागरिकांच्या जमिनी गेलेल्dया आहेत. पण त्यांनी त्यासाठी विरोध केलेला नाही. मात्र कालेवासियांची जी मागणी आहे ती पुर्ण होत नसल्याने काले पंचायतीचे माजी उपसरपंच विलास बिचोलकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दीपश्री नाईक या महिलेने दिलेल्या माहितीनुसार काले पंचायत क्षेत्रातील अनेक विद्यार्थी व नागरिक या दुपारच्या रेल्वे गाडीवर अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या मासिक पासही काढलेले आहेत. मात्र रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाकडून चलढकल केली जात आहे. याबद्दल त्यांनी संताप व्यक्त करून लवकारत लवकर रेल्वे गाडया सुरू करायची मागणी केली.

रेल्वेची इतर वाहतूक सुरळीत फक्त लोकल ट्रेन बंद का? 

महत्वाचे म्हणजे काले भागातील विद्यार्थी हे कुडचडे येथील गार्डन इंजल व श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक ह्dया उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. ह्या रेल्वे बंद असल्याने या विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेची इतर सर्व वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र लोकांना स्थानिक नागरिकांना विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी रेलगाडी बंद ठेवण्यात आले आहे. यामागील कारण कोणते हे न समजण्यापलीकडेच आहे अशा त्या म्हणाल्या.

पास काढला मात्र लोकल ट्रेनचा पत्ताच नाही-राजाराम देऊळकर 

ज्येष्ठ नागरिक राजाराम देऊळकर यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून ह्या रेल्वे गाड्या सुरू आहेत. आणि त्याचा फायदा येथील विद्यार्थी व नागरिकांना होत होता. नागरिकांनी रेल्वे प्रवासाचे पासही काढलेला आहेत मात्र गेल्या तीन चार महिन्यापासून ज्या प्रकारे रेल्वेचा कारभार सुरू आहे ते पाहिल्यास रेल्वे विभागाकडून या रेल्वे रद्द करण्याचा बेत तर नाही ना असा संशय त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article