For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

10:54 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
Advertisement

शंभरहून अधिक धारकऱ्यांनी घेतला सहभाग

Advertisement

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, यासाठी धर्मवीर बलिदान मास पाळला जात आहे. बलिदान मासनिमित्ताने शिवप्रतिष्ठानच्या बेळगाव शाखेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण शंभर रक्तदात्यांनी रक्तदान करून धर्मकार्यासोबत सामाजिक कार्यातही आपले योगदान दिले. रविवारी लोकमान्य रंगमंदिर येथे केएलई ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बेळगावसह ग्रामीण भागातील धारकऱ्यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला. यावेळी केएलई ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत विरगी यांनी रक्तदानाचे महत्त्व कार्यकर्त्यांना पटवून दिले. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते वर्षभर गरजेनुसार रक्तदान करत असतात. आजवर शेकडो गरजूंपर्यंत शिवप्रतिष्ठानने रक्तपुरवठा केला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, विभागप्रमुख हिरामणी मुचंडीकर, किरण बडवाण्णाचे, चंद्रशेखर चौगुले, प्रमोद चौगुले, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रफुल्ल शिरवलकर, मल्लेश बडमंजी, विनायक कोकितकर, विजय कुंटे, गजानन निलजकर यासह शिवप्रतिष्ठानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बलिदान मासचे आचरण

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून संपूर्ण महिना बलिदान मास म्हणून आचरणात आणला जातो. या काळात संभाजी महाराजांच्या बलिदानाचे महत्त्व युवकांना पटवून दिले जाते. धार्मिक कार्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे अनेक गरजूंना वेळेत रक्त मिळणे सोयीचे होणार आहे.

- किरण गावडे (कर्नाटक प्रांतप्रमुख)

Advertisement
Advertisement
Tags :

.