For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीका, आरोपांना सक्षम प्रत्युत्तर द्या

04:44 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
टीका  आरोपांना सक्षम प्रत्युत्तर द्या
Advertisement

भाजपचे बी. एल. संतोष यांचे मार्गदर्शन

Advertisement

पणजी : भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष हेही गोव्यात दाखल झाले असून सर्वप्रथम त्यांनी सांकवाळ येथे भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दि. 27 रोजी होणाऱ्या जाहीर सभास्थळी तयारीची पाहणी केली. त्याचबरोबर विरोधकांची टीका, आरोपांना सक्षम प्रत्युत्तर द्या, अशी सूचना भाजपचे राष्ट्रीय नेते बी. एल. संतोष यांनी भाजपला केली आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दोन्ही जागा मोठ्या मताधिक्क्याने जिंकणार असा दावा करणाऱ्या भाजपने आता प्रचारातही आघाडी घेतली असून त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांनीही एकेक करत गोव्यात दाखल होणे प्रारंभ केले आहे. गुऊवारी गोव्यात दाखल झालेले राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दोन्ही मतदारसंघांतील प्रचाराचा आढावा घेतला. बी. एल. संतोष हेही गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांनी पणजी भाजप मुख्यालयात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह अन्य मंत्री, आमदार, गाभा समिती सदस्य, प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रचाराची गती आणि अन्य तयारीसंबंधी माहिती जाणून घेतली.

विरोधकांची टीका, आरोपांचा समाचार घ्या

Advertisement

विरोधकांनाही कमी लेखू नका, त्यांच्याकडून होणारे आरोप, टीका यांचा सक्षमपणे समाचार घेताना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांचा योग्य वापर करून घ्यावा, असे मार्गदर्शनही संतोष यांनी केले. आज शुक्रवारी ते दक्षिण गोव्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून त्यानंतर जिल्हा पातळीवरही त्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रचारात कोणत्याही त्रुटी नकोत

भाजपने उत्तर गोव्यात विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली आहे. नाईक हे सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर दक्षिणेत श्रीमती पल्लवी धेंपो यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही उमेदवारांबद्दल जनमानसातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया, तसेच सर्वेक्षणातून समोर आलेले मुद्दे व त्यांचे निरसन करण्याची रणनीती, प्रचारातील सकारात्मक मुद्दे आणि त्रुटी, यासंबंधीही संतोष यांनी माहिती घेतली.

Advertisement
Tags :

.