महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हिमाचलमध्ये तीन अपक्ष आमदारांचे राजीनामे मंजूर

06:22 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विधानसभा अध्यक्ष पठानिया यांचे पाऊल

Advertisement

वृत्तसंस्था/ शिमला

Advertisement

हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी तीन अपक्ष आमदार होशियार सिंह, के.एल. ठाकूर आणि आशिष शर्मा यांचे राजीनामे मंजूर केले आहेत. होशियार सिंह, के.एल. ठाकूर आणि आशिष शर्मा यांनी 22 मार्च रोजी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्याच दिवशी तिन्ही आमदार भाजपमध्ये सामील झाले होते. यासंबंधी पक्षांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत जगत नेगी यांनी अर्ज केला होता. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणी चौकशी केली होती. यानंतर आता तिन्ही आमदारांचे राजीनामे मंजूर करण्यात आले असून सोमवारपासून ते विधानसभा सदस्य राहिले नाहीत.

पक्षांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत दाखल याचिकेवर अंतिम सुनावणी अद्याप झालेली नसल्याचे पठानिया यांनी सांगितले आहे. तर अपक्ष आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्याने देहरा, नालागढ आणि हमीरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राजीनामा मंजूर करण्यासंबंधीचा निर्णय विलंबाने झाला आहे. लोकसभेसोबत विधानसभा पोटनिवडणूक व्हावी या उद्देशाने राजीनामा दिला होता. परंतु आता तिन्ही मतदारसंघांसाठी स्वतंत्र स्वरुपात पोटनिवडणूक होणार असल्याने तीन जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे, यामुळे विकासकामे प्रभावित होतील असे के.एल. ठाकूर यांनी सांगितले आहे. अपक्ष आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्याने आता विधानसभेत 59 सदस्य राहतील. यात काँग्रेसचे 34 आणि भाजपचे 25 आमदार सामील आहेत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article