महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विजयनगर परिसरातील रहिवाशांचे महापौरांसमोर गाऱ्हाणे

12:17 PM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : विजयनगर, विनायक नगर, रक्षक कॉलनी, सिंधी कॉलनी परिसरामध्ये गटारी, नाला, रस्त्यांची समस्या निर्माण झाली. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत महापौर सविता कांबळे या परिसराच्या नगरसेविका विणा विजापुरे यांनी पाहणी केली. यावेळी तेथील नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्याचा पाढाच वाचला. गटारींचे पाणी निचरा होण्यासाठी सीडीची आवश्यकता होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या सिडीचे कामच करण्यात आले नाही. त्यामुळे गटारीमधील पाण्याचा निचरा होणे अशक्य झाले. याचबरोबर रस्तेदेखील खराब झाले आहेत. तेव्हा रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. पाणी पुरवठाही वेळेत केला जात नाही. त्यामुळे पाण्याची समस्याही गंभीर बनली आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, हा सर्व परिसर उंच टेकडावर असल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा अधिक दाबाने पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आले आहे. या सर्व समस्या ऐकून घेऊन त्यावर निश्चितच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article