महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उद्धरावा स्वये आत्मा

06:01 AM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

बाप्पा म्हणाले, केवळ चित्तशुद्धी व्हावी म्हणून कर्मयोगी कर्म करतात. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसल्याने तसेच काही मिळवावे ह्या आशेने कोणतेही कर्म करत नसल्याने त्यांच्यातील राग, द्वेष, सुख, दु:ख इत्यादि सामान्य माणसात आढळणारे विकार नाहीसे होतात आणि सत्य, क्षमा, दया, सरलता, संतोष हे सद्गुण त्यांच्या स्वभावात सहजी दिसून येतात. शुद्ध झालेल्या चित्तामुळे आणि अंगी प्रकटलेल्या सद्गुणांमुळे सर्वांचे भले व्हावे ह्या हेतूने त्यांच्या हातून अधिकाधिक लोककल्याणकारी कार्ये सहजी होऊ लागतात. याउलट कर्मयोग न आचरणारे आणि स्वत:च्या मूळ स्वरूपाचे ज्ञान नसलेले लोक स्वत:ला कर्ता समजतात आणि मनात काही अपेक्षा ठेऊन कर्मे करतात, त्यांना कधीच समाधान मिळत नाही. कर्मयोगी सुखी का असतो त्याचं रहस्य सध्या आपण अभ्यासत असलेल्या मनसा सकलं कर्म त्यक्त्वा योगी सुखं वसेत्। न कुर्वन्कारयन्वापि नन्दश्वभ्रे सुपत्तने  ।।12।। ह्या श्लोकात बाप्पा सांगत आहेत. त्यानुसार कर्मयोगी स्वत:ला कर्ता मानत नसल्याने तो करत असलेली लोककल्याणकारी कामे ईश्वर त्याच्याकडून करून घेत आहेत अशी त्याची पुरेपुर खात्री असते. त्यासाठी आवश्यक त्या शारीरिक हालचालीही तेच घडवून आणत आहेत असे तो समजत असतो. त्यामुळे अमुक एक करावे अथवा अमुक एक करू नये असे त्याच्या मनात कधीही येत नाही. जशी ईश्वरी प्रेरणा होईल त्यानुसार तो वागत असतो. त्याला माहित असतं की, त्याचं आयुष्य कसं चालावं किंवा त्याच्या हातून कोणती कर्मे व्हावीत इत्यादि गोष्टी ईश्वर नियंत्रित करत असून त्याच्या नियंत्रणानुसार तो यंत्रवत कामे करून आयुष्य व्यतीत करत असल्याने तो गुहेमध्ये अथवा मोठ्या नगरामध्ये कुठेही आनंदात राहू शकतो.

Advertisement

मनुष्य निरनिराळे बेत करत असला तरी तो कर्ता नसल्याने कुणाकडून कोणती कर्मे करून घ्यायची हे सर्व नियती ठरवत असते असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

क्रिया न च कर्तृत्वं कस्य चित्सृज्यते मया ।

न क्रियाबीजसंपर्कऽ शक्त्या तक्रियतेऽ खिलम्  ।।13।।

अर्थ- कोणाचे कर्म अथवा कोणाच्या कर्माचे कर्तृत्व अथवा कोणाच्या कर्मबीजाचा फलेच्छेचा किंवा वासनेचा संबंध देखील मी उत्पन्न करीत नाही. हे सर्व माया करते.

विवरण- बाप्पा म्हणाले, सर्व जगाची निर्मिती आणि संचालन मायारुपी शक्तीच्या सहाय्याने होत असते. त्यात माझा काहीही सहभाग नसतो. मी जरी कर्ताकरविता आहे असे लोक म्हणत असले तरी प्रत्येक मनुष्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार त्याला सध्याचा जन्म कुठला मिळणार, त्यात त्यानं कोणती कामं करायची आहेत हे सर्व नियती ठरवत असते. ही कामं करण्यासाठी त्याला त्रिगुणांपैकी आवश्यक त्या गुणाचे प्राबल्य असलेला स्वभाव व घराणे प्राप्त होते. कुठं जन्म घ्यायचा, काय काम करायचं हे सर्व जर पूर्वनियोजित असेल तर मग माणसाच्या हातात काय आहे, असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर असं की, काम कुठलंही असो त्यानं काही फरक पडत नाही पण सदैव ईश्वरस्मरण करत मिळालेलं काम निरपेक्षतेनं करणं आणि स्वत:चा उध्दार करून घेणं हे माणसाच्या हातात आहे. त्यालाच आपल्या आत्म्याचा आपणच उद्धार करणे असे म्हणतात. भगवद्गीतेतही भगवंतांनी सहाव्या अध्यायात उद्धरावा स्वये आत्मा असं सांगितलंय.

उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी ।

आत्मा चि आपुला बंधु आत्मा चि रिपु

आपुला ।।6.5 ।।

हे करत असताना त्याला काही अडचणी आल्या तर त्या सुसह्य करायचं काम मात्र मी करत असतो. स्वत:च स्वत:चा उध्दार करावा असं जरी सांगितलं असलं आणि ते पटतही असलं तरी माणसं बाप्पानी किंवा भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे का वागत नाहीत याचं उत्तर बाप्पा पुढील श्लोकात देत आहेत.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article