महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वायनाडला मदत-बचावकार्य सुरूच

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मृतांच्या आकड्यात वाढ : राहुल, प्रियांका गांधींची घटनास्थळी भेट

Advertisement

वृत्तसंस्था /वायनाड

Advertisement

केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. आतापर्यंत 177 जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती वायनाड जिल्हा प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केली. अजूनही जवळपास 200 लोक बेपत्ता असल्याचे माहिती उपलब्ध झाली असून जेसीबीद्वारे मातीचे ढिगारे उपसून त्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच 130 लोक ऊग्णालयात आहेत.

हवामान खात्याने गुऊवारी वायनाडमध्ये पुन्हा पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने पुन्हा काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका व्यक्त केला आहे. ड्रोन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्निफर डॉगच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. रात्रभर काम करून लष्कराने बेली ब्रिजचे काम पूर्ण केले आहे. या पुलावरून लोकांची ये-जा सुरू झाल्याने दोन गावांमधील संपर्क सुरू झाला. मुंडक्काई ते चुरलमाला गावांना जोडण्यासाठी लष्कराने 85 फूट लांबीचे बेली ब्रिज बांधले आहे. पूल बांधण्यासाठी दिल्ली आणि बेंगळूर येथून साहित्य आणण्यात आले आहे. हा पूल 24 टन वजन सहन करू शकतो. पूल बांधल्यानंतर आता बचावकार्याला वेग आला आहे.

शोध मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्याचे प्रयत्न तीव्र केले. नद्यांवर आता छोटे तात्पुरते पूल बांधले जात आहेत. चिखल आणि दगडांचे ढिगारे काढण्यासाठी जेसीबी मशीन्सची मदत घेतली जात आहे. लष्कराचे कर्मचारी, एनडीआरएफ, राज्य आपत्कालीन सेवा कर्मचारी आणि स्थानिक लोकांसह बचाव कर्मचारी, अनेक भागात पाऊस सुरू असूनही कठीण ऑपरेशन पार पाडण्यासाठी सर्व अडचणींचा सामना करत आहेत. सोमवारी मध्यरात्री 2 ते मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान मुंडक्काई, चुरलमला, अट्टामला आणि नूलपुझा गावात दरड कोसळली. यात घरे, पूल, रस्ते, वाहने वाहून गेली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत 1,592 जणांची सुटका करण्यात आली असून 3 हजार लोकांना मदत शिबिरात पाठवण्यात आले आहे.

अजूनही भूस्खलनाचा धोका

राज्यात पावसाचे सत्र सुरूच असून नजिकच्या काळात भूस्खलनाच्या आणखीही घटना घडू शकतात. संभाव्य धोक्यामुळे वायनाडचे जिल्हाधिकारी डी. आर. मेगाश्री यांनी कुऊंबलाकोट्टा, लकिती मणिकुनू माला, मुट्टिल कोलपारा कॉलनी, कपिकलम, सुधांगिरी आणि पोशुथाना भागात राहणाऱ्या लोकांना मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या भीतीने घरे सोडण्यास सांगितले आहे. याआधी बुधवारी लोकांना भूस्खलन झालेल्या भागांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article