Miraj News : कत्तलीसाठी नेणाऱ्या तीन गायींची सुटका ; मिरजेतील एकास अटक
कुपवाड पोलिसांची कारवाई
कुपवाड : कुपवाड ते माधवनगर रस्त्यावरून टेम्पोमधून कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे घेऊन जाणाऱ्या तीन जनावरांची कुपवाड पोलिसांनी कारवाई करून सुटका केली. यामध्ये दोन गाई व एका वासराचा समावेश आहे. या कारवाईत एका संशयितास पोलिसांनी अटक केली. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
यामध्ये संशयित मौलाली अब्बास शेख (वय २६, खॉजा बस्ती, मिरज ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. टेम्पोही जप्त केला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी कुपवाड कुपवाड पोलिसांनी कत्तलीसाठी गायी व वासरु घेऊन जाणारा टेम्पो जप्त केला आहे. रात्री कुपवाड पोलिस ठाण्यातील कर्मचारी कुपवाड ते माधवनगर रस्त्यावर गस्तीवर होते. यावेळी माधवनगरहून कुपवाडमार्गे एक संशयितरित्या टेम्पो (एम. एच. ०९ सी. यु. ७३८५) भरधाव वेगाने मिरजेकडे जात होता.
माहिती मिळताच पोलिसांनी टेम्पोला थांबवून टेम्पोची पाहणी केली. टेम्पोमध्ये २ गायी व १ वासरू आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मौलाली शेख असे नाव सांगितले. बेकायदेशीर मुक्या जनावरांची वाहतूक करणारा टेम्पोसह २ गायी व वासराची सुटका करून संशयितास अटक केली. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.