विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा
सुळगा (हिं.) तालुका विविध सहकारी संघ
सुळगा (हिंडलगा) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाच्यावतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. ध्वजारोहण संस्थापक चेअरमन अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत मॅनेजर एन. वाय. चौगुले यांनी केले. फोटो पूजन संचालक शिवाजी गावडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. गणपत पाटील, शिवाजी पाटील, लक्ष्मण खांडेकर, निंगाप्पा देसुरकर, उपाध्यक्ष बी. एन. बेनके उपस्थित होते. प्रकाश बेळगुंदकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सोसायटीच्यावतीने मिठाईचे वाटप करण्यात आले.
भाग्योदय सोसायटी उचगाव
येथील भाग्योदय महिला मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन संस्थेचे संस्थापक बी. एस. होनगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ध्वजारोहण चेअरपर्सन दीपाली दीपक नवार व व्हॉईस चेअरपर्सन सिंधू एन. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. फोटो पूजन अशोक हुक्केरीकर तर मॅनेजर उषा लोकनाथ कावळे यांनी स्वागत केले. सविता हुक्केरीकर, सुनीता होनगेकर, कविता लाळगे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सुधा पावले यांनी करून आभार मानले.
जितो लेडिज विंग
जितो लेडिज विंगच्यावतीने यावर्षी 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर येथील कन्नड शाळेमध्ये साजरा करण्यात आला. सुनीता संचेती यांनी पाण्याच्या तीनशे बाटल्या विद्यार्थ्यांना भेट स्वरुपात दिल्या. चेअरमन माया जैन यांच्या हस्ते सुनीता संचेती यांचा सत्कार करण्यात आला. शहराच्या गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांनी जितोच्या कार्याचे कौतुक केले.
सुभाषचंद्रनगर
सुभाषचंद्रनगर येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योजक सुरेश प्रभू उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी खणगावकर सर, गजानन राणे, राजेश तेंडुलकर यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश चिरमुले यांनी आभार मानले. राधिका तेंडुलकर यांनी सूत्रसंचालन तर शीला हंगिरगेकर यांनी उत्तम रांगोळी रेखाटली होती.
बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशन
ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशनतर्फे 75 वा प्रजासत्ताक दिन फोर्ट रोड येथे साजरा करण्यात आला. उद्योजक सुहास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील, सेक्रेटरी कमरुद्दीन, सुरेश पाटील, मनजितसिंग यासह इतर उपस्थित होते.
सांबरा विमानतळ
सांबरा येथील बेळगाव विमानतळावर 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विमानतळ संचालक एस. त्यागराजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विमानतळ परिसरातील पोलिसांनी शानदार पथसंचलन सादर केले. यावेळी विमानतळ कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्तीपर गीतगायन केले.
लायन्स क्लब बेळगाव
लायन्स क्लब ऑफ बेळगावच्या सदस्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून समृद्धी फाऊंडेशनच्या अनाथाश्रमाला भेट दिली. 28 अनाथ मुले असणाऱ्या या आश्रमाला धान्य, कपडे, फळे, खेळणी, गृहोपयोगी साहित्य भेट स्वरुपात देण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सोमनाथ कोळकी, लक्ष्मी कोळकी, अरुण जोतावर, उदय व भारती वडवी, डॉ. मगदूम यासह इतर सदस्य उपस्थित होते.
ह्युमॅनिटी ग्रुप
बेळगाव ह्युमॅनिटी ग्रुपतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खानापूर रोड, टिळकवाडी येथील समर्थनम ट्रस्टला भेट देण्यात आली. ग्रुपतर्फे संस्थेला अन्नधान्य देण्यात आले. मुलांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ह्युमॅनिटी तसेच समर्थनम संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बेळगाव रेल्वेस्थानक
रेल्वेस्थानकामध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्टेशन मॅनेजर अनिलकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाच्या रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी एस. आर. कारेकर, भीमाप्पा, अमोल कोपर्डे, अभिनव कुमार, प्रकाश गस्ती यांच्यासह रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अरिहंत हॉस्पिटल
अरिहंत हॉस्पिटलतर्फे 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. प्रभू हलकट्टी, डॉ. वरदराज गोकाक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हॉस्पिटलचे एमडी व सीईओ डॉ. एम. डी. दीक्षित म्हणाले, रुग्णसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा हे ब्रिद घेऊन सुरू झालेल्या अरिहंत हॉस्पिटलचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची आम्ही सेवा करत आहोत. यातून आम्हाला आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. किशोर भट, डॉ. अभिषेक जोशी, डॉ. अमृता जोशी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. विजय पाटील, डॉ. सूरज पाटील, मल्लेश य•ाr यासह इतर उपस्थित होते.