गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट शासकीय नोकरी !
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्वपूर्ण निर्णय : आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या कामगिरीला मिळणार संधी
संग्राम काटकर कोल्हापूर
विविध खेळात उत्तम कामगिरी केलेल्या राज्यभरातील खेळाडूंचे मनोबल वाढवणारा निर्णय शासनाने घेतला आहे. आपल्या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्युच्च गुणवत्ताधारक कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या महिला व पुऊष खेळाडूंना सुधारीत धोरणानुसार शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. या निर्णयाने तब्बल 551 खेळाडूंना नव्या व जुन्या पदांवर सेवा बजावता आहे. या संधीने गेली एक दशक प्रशिक्षक, खेळाडूंकडून नोकरी देण्याबाबत केल्या जात असलेल्या मागणीला न्याय मिळाला आहे. सध्या शासकीय सेवेतील थेट नियुक्तीबाबत मागवलेल्या हरकतींवर क्रीडा विभाग गांभिर्याने विचार करत आहे. हरकतींमधून लवकरच सुवर्णमध्य काढून खेळाडूंना शासकीय सेवेचे द्वारही खुले केले जाणार आहे.
दरम्यान, शालेय जीवनापासून ते कॉलेज-विद्यापीठ पातळीवरील स्थानिकपासून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू प्रतिनिधीत्व करत मोठ्या जिकरीने सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके मिळवत असतो. त्याच्या या कामगिरीमुळे शाळा-कॉलेजचेही नावलौकिक होते. सरावासाठी बहुतांश खेळाडूंना पदरमोड कऊन व्यायाम साहित्य, खुराक घ्यावा लागतो. जसा खेळ असतो तसा सरावाचाही खर्चही जास्ती असतो. खेळाडूचे पालक सराव, खुराकावर भरपूर पैसे खर्च करतात. पालकांवरील आर्थिक भार कमी होण्यासाठी खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांनी खेळात चांगली कामगिरी करत पदके मिळवणाऱ्या खेळाडूंना 5 टक्के आरक्षण द्यावे. अथवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दाखवलेल्या उत्तम गुणवत्तेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घ्यावे, अशी मागणी शासन दरबारी लावून धरली होती. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनही सातत्याने आरक्षणाची मागणी करत होते.
क्रीडा विभागाने या मागणीचा गांभिर्याने विचार कऊन शासकीय सेवेतील थेट नियुक्तीला हिरवा कंदिल दाखवला. खेळाडूंना शासकीय सेवेतील थेट नियुक्तीनूंतर संबंधित पदावर सेवाप्रवेशाच्या नियमानुसार हजर केले जाईल. तसेच पतियाळा (पंजाब) येथील नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था किंवा बेंगळूरु, कोलकाता येथील मान्यताप्राप्त संस्थेची क्रीडा मार्गदर्शन क्षेत्रातील पदविका मिळवणे खेळाडूला बंधनकारक असणार आहे. ज्याला पदवी मिळवणे शक्य नाही त्याने किमान आंतरराष्ट्रीय खेळ महासंघाव्दारे घेतला जाणारा लेव्हल कोर्स हा करावा लागले. ज्याला कोर्स ही करणे अशक्य आहे त्याने इतर मान्यता प्राप्त संस्थेकडून आपल्या खेळाची प्रशिक्षण पदविका मिळवून ती क्रीडा विभागाकडे सादर करावी लागेल.
अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना खालील पदांवर मिळणार थेट नियुक्ती :
पदे जागा
1) सहसंचालक, क्रीडा प्रशिक्षण
(गट-अ) (मुख्यालयात) 1
2) उपसंचालक, क्रीडा प्रशिक्षण-विशेष कार्य 1
प्रशिक्षण अधिकारी (गट-अ)
3) मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण) 72
(गट-अ)
4) क्रीडा कार्यकारी अधिकारी (प्रशिक्षण) 117
(गट-ब राजपत्रित)
5) क्रीडा विकास अधिकारी (प्रशिक्षण) 180
(गट-ब अराजपत्रित)
6) सहायक क्रीडा विकास अधिकारी (प्रशिक्षण) 180
(गट-क)
कष्टाचे चिझ होणार...
शासनाच्या क्रीडा विभागाने गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट शासकीय सेवेत सामावण्याचा घेतलेला निर्णय आनंददायी आहे. या निर्णयामुळे आशियाई, राष्ट्रकुल, जागतिक, ज्युनिअर वर्ल्ड या क्रीडा स्पर्धेसह पॅरालिंम्पिक, पॅरालिंम्पिक आशियाई, वर्ल्ड पॅरलिंम्पिक आदी क्रीडा स्पर्धेत पदके मिळवण्यासाठी धडधाकट व दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या कष्टाचे चिझ होणार आहे. याचबरोबर नोकरदार खेळाडूंच्या माध्यमातून क्रीडा विभागाला आता नव्या योजनांची अंमलबजावणी करणे सोपे जाणार आहे. तसेच उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठीही हेच नोकरदार खेळाडू कामी येणार आहेत.
रिया पाटील (आंतरराष्ट्रीय धावपटू)