होंडातील लायमनमन मृत्यूचा अहवाल सरकारला सादर
पणजी : होंडा येथे वीज दुऊस्तीचे काम करताना वीज लायमनमन चंद्रू गावकर यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. जनरेटरमधून रिव्हर्स वीजप्रवाह आल्यामुळे लायमन गावकर यांचा मृत्यू झाल्याबाबतचे एक कारण अहवालात आहे. सुरक्षेचे उपाय म्हणून जनरेटर, इन्व्हर्टरसाठी नोंदणी व सुरक्षेचे उपाय सक्तीचे करण्यात आलेले आहेत. चंद्रू गावकर यांना शॉक लागला, त्यानंतर या घटनेचा चौकशी अहवाल वीज खात्याने तयार केला आहे. या अहवालात शॉक लागण्याची अनेक कारणे आहेत. वीज खात्याने तयार केलेल्या अहवालात लायमनच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना सूचविण्यात आलेल्या आहेत. जनरेटर तसेच इन्व्हर्टरची नोंदणी करण्यासाठीही सुरक्षा उपाय आहेत. इन्व्हर्टरना स्वतंत्र स्वीच (खटका) बसवण्याची खात्याने सरकारकडे अहवालातून शिफारस केली आहे, असेही वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.