केंद्र सरकारचे ‘ते’ नवे कायदे रद्द करा
जुने कायदे कालबाह्य होणार : कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता
बेळगाव : केंद्र सरकारकडून चार नव्या कामगार संहिता लागून करण्यात आल्या आहेत. कामगार वेतन संहिता. औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता व कामस्थान सुरक्षा व आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता हे चार नवे कायदे लागू करण्यात आले आहे. यामुळे जुने कायदे कालबाह्य होणार आहेत. मात्र या नव्या कायद्यामुळे कार्मचाऱ्यांवर अन्याय होणार असून, याच्या दूरगामी परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. यासाठी हे कायदे रद्द करण्याची मागणी राज्य वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात, या चार नव्या कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यामध्ये लाखो एसईपी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या नव्या कायद्यांतर्गत संघर्ष करून मिळविलेल्या एसईपीला संरक्षण देण्यात आले नसून असुरक्षिता प्रदान करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार असून, त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी हे नवे कायदे रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.