महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आसाममध्ये मुस्लीम विवाह, घटस्फोट नोंदणी कायदा रद्द

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री हेमंत शर्मा यांच्याकडून घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था /गुवाहाटी

Advertisement

आसाम सरकारने राज्य मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी अधिनियम 1935 रद्द केला आहे. मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. आता या कायद्याची जागा आता आसाम रिपीलिंग विधेयक 2024 घेणार आहेत. बाल विवाहाच्या विरोधात अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करून आम्ही आमच्या मुली आणि भगिनींसाठी न्याय सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही आसाम निरसन विधेयक 2024 द्वारे आसाम मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी अधिनियम 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे हेमंत शर्मा यांनी म्हटले आहे.

संबंधित विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे. राज्यात मुस्लीम विवाहांच्या नोंदणीसाठी कायदा आणण्याचा निर्देश मंत्रिमंडळाने दिला आहे. या मुद्द्यावर देखील विधानसभेत चर्चा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारी राज्यातील मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याचे म्हणत लोकसंख्येच्या स्वरुपात झालेल्या बदलाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. लोकसंख्येचे बदलते स्वरुप माझ्यासाठी गंभीर मुद्दा आहे. आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या 1951 मध्ये 12 टक्के होती. आता हे प्रमाण वाढून 40 टक्के झाले आहे. आम्ही अनेक जिल्ह्यांवरील नियंत्रण गमाविले आहे. हा केवळ राजकीय विषय नसून माझ्यासाठी जीवन आणि मरणाचा विषय असल्याचे शर्मा यांनी म्हटले हेते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article