For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये दोन सैनिकांना वीरमरण

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये दोन सैनिकांना वीरमरण
Advertisement

नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट : जखमी झालेल्या चार जवानांना केले एअरलिफ्ट

Advertisement

वृत्तसंस्था /बिजापूर

छत्तीसगडमध्ये नक्षलवादविरोधी विषेश कृती दलाच्या दोन सैनिकांना नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात वीरमरण प्राप्त झाले आहे. या राज्याच्या बिजापूर जिल्ह्यात बुधवारी ही घटना घडली. नक्षलींनी स्फोटकाच्या सहाय्याने हा हल्ला केला होता. त्यात चार सैनिक जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी हेलिकॉप्टरने रायपूरला नेण्यात आले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी या जीवितहानीमुळे शोक व्यक्त केला असून या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे. बिजापूर जिल्ह्याच्या टेराम भागातील वनप्रदेशात ही घटना घडली. विशेष कृती दलाची एक तुकडी वनप्रदेशात नक्षलींविरोधातील कार्यवाही आटोपून आपल्या ठाण्यावर परतत असताना वाटेत नक्षलींनी पेरलेल्या स्फोटकाचा स्फोट झाल्याने सैनिकांच्या वाहनाचा चक्काचूर झाला. या वाहनात सहा सैनिक होते. त्यांच्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement

परिसराची घेराबंदी

ही घटना घडल्यानंतर त्वरित विशेष कृती दलाने या भागात आणखी सैनिकांची नियुक्ती केली असून परिसराची घेराबंदी करण्यात आली आहे. स्फोट घडविणाऱ्या नक्षलींना शोधण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे. राज्याच्या वनविभागातून नक्षलींचा नायनाट केल्याखेरीज सरकार स्वस्थ बसणार नाही. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेने नक्षलींची नाकेबंदी केली आहे. त्यामुळे नैराश्यापोटी त्यांनी हा हल्ला केला, असे प्रतिपादन दलाच्या अधिकाऱ्यांनी केले.

Advertisement
Tags :

.