महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुसरे रेल्वेगेटवरील दुरुस्ती पूर्ण

11:30 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाहनधारकांना वळसा : रविवार असल्याने तुरळक वाहतूक

Advertisement

बेळगाव : टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट परिसरात नैर्त्रुत्य रेल्वेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने दिवसभर रस्ता बंद ठेवण्यात आला होता. रेल्वेट्रॅकची दुरुस्ती करण्यासोबतच इतर कामेही करण्यात आली. यामुळे पहिल्या व तिसऱ्या रेल्वेगेटमार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी दुसरे रेल्वेगेट येथे रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. अनगोळ कॉर्नर येथे बॅरिकेड लावून रहदारी पोलिसाची नेमणूक करण्यात आली होती.

Advertisement

रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने कार्यालये, शाळा बंद होत्या. त्यामुळे तितकीशी वाहनांची वर्दळ नव्हती. यामुळे दुरुस्तीचे काम करणे शक्य झाले. रेल्वेगेट परिसरात लावण्यात आलेले पेव्हर्स काढून रेल्वेट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली. दुसरे रेल्वेगेट बंद असल्याने वाहनचालकांना पहिले रेल्वेगेटपर्यंतचा उलटा प्रवास करत टिळकवाडीच्या वरच्या भागात ये-जा करावी लागत होती. यामुळे सायंकाळी काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काम पूर्ण होताच रेल्वेगेट वाहतुकीसाठी पुन्हा खुले करण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article