महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रस्त्यावर वाहणारे भू-गटाराचे सांडपाणी रोखण्यासाठी दुरुस्ती सुरू

12:16 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : फातोर्डा येथील सेंट झेवियर कपेलनजीक ‘चस्टनट सलून’समोरील रस्त्यावर भू-गटारातील मलमूत्रमिश्रित सांडपाणी मॅनहोलमधून वाहत असल्याने येथे दुर्गंधी पसरली होती. संबधित विभागाने यावर आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवासी तसेच दुकानदारांकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन दुरुस्तीकाम सुरू करण्यात आले आहे. सदर मॅनहोलमध्ये प्लास्टिक, बाटल्या व अन्य कचरा अडकल्याने हा प्रकार घडत होता, असे दिसून आलेले आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी मोठे यंत्र मागवून काम सुरू करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून सदर सांडपाणी रस्त्यावरून वाहण्याचा प्रकार सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला होता. यामुळे येथे दुर्गंधी पसरून डासांची पैदास होऊ लागली होती. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली होती. या प्रकारामुळे ग्राहक पाठ फिरवित असल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याची कैफियत दुकानदारांनीही व्यक्त केली होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article