शिंदोळी क्रॉस-भरतेश कॉलेजपर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ
11:03 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सांबरा : शिंदोळी क्रॉस ते भरतेश कॉलेजपर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ करण्यात आल्याने वाहन चालकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शिंदोळी क्रॉस ते बसरीकट्टीपर्यंतच्या सुमारे सहा किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी चरी खोदण्यात आल्या आहेत. तसेच या रस्त्यावर अनेक शाळा व महाविद्यालय आहेत त्यामुळे शालेय वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांची गैरसोय होत होती. याची दखल घेऊन अखेर गुरुवारी रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले .त्यामुळे वाहन चालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Advertisement
Advertisement