गणेशोत्सवापूर्वी वीजवाहिन्यांची दुरुस्ती करा
लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे हेस्कॉमला निवेदन
बेळगाव : बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. 350 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. गणेशोत्सवाच्या काळात लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या, कलंडलेले वीजखांब यामुळे मंडळांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करून मंडळांना सहकार्य करावे, असे निवेदन लोकमान्य टिळक गणेश महामंडळाच्यावतीने हेस्कॉमला देण्यात आले. गणेशोत्सवाचे मंडप घालताना तारांचे अडथळे येतात, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, वीजवाहिन्यामुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळे येत असतात. त्यामुळे वीज वाहिन्यांची उंची वाढविण्यासोबत धोकादायक ठिकाणचे ट्रॉन्स्फॉर्मर दुरूस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांनी निवेदन स्विकारून तात्काळ दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक गिरीश धोंगडी, हेमंत हावळ, सुनील जाधव, प्रवीण पाटील, गजानन हंगीरगेकर, सौरभ सावंत यासह इतर उपस्थित होते.