महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कर्ले-बहाद्दरवाडी तगोडीजवळील रस्त्याची श्रमदानाने दुऊस्ती

10:33 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्ले ग्रा. पं. सदस्यांचा उपक्रम : वाहनधारकांतून समाधान 

Advertisement

वार्ताहर /किणये  

Advertisement

कर्ले-बहाद्दरवाडी तगोडीजवळील रस्ता धोकादायक बनला होता. या तगोडीजवळ लहान पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे अनेक वाहनधारक या ठिकाणी पडून किरकोळ जखमी झाले होते. या ठिकाणचे कामकाज निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाचे या रस्त्याच्या दुऊस्तीकडे दुर्लक्ष झाले होते. या संदर्भात सविस्तर बातमी दि. 14 रोजी ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध करण्यात आली. याची दखल घेत अखेर कर्ले गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन श्र्रमदानाने रस्त्याची दुऊस्ती केली. कर्ले-बहाद्दरवाडी तगोडीजवळ लहान पूल बांधण्यात आला होता. मात्र या ठिकाणचे कामकाज सदर कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केले असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांतून होत आहेत. गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी रस्त्याची अशीच अवस्था होती. त्यामुळे वाहनधारकांना रात्रीच्या वेळी ये-जा करणे अवघड बनले होते. 10 दिवसापूर्वी कर्ले गावाला जाणाऱ्या बसचे टायर या लोखंडी सळ्यांमध्ये अडकली होती. सुदैवाने अनर्थ टळला होता.

या भागातील गावासाठी हा मुख्य रस्ता आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांसाठी ‘तरुण भारत’मधून दि. 14 रोजी या रस्त्यासंदर्भात आवाज उठविण्यात आला. ग्रा.पं. सदस्य विनायक पाटील व वसंत सांबरेकर यांनी आपल्या स्वखर्चातून गावातील नागरिकांना घेऊन श्र्रमदानाने या रस्त्याची दुऊस्ती केली आहे. प्रारंभी पुलावरील रस्त्यावर आलेल्या लोखंडी सळ्या कट करून काढण्यात आल्या. त्यानंतर या ठिकाणी दगड, मुरूम माती टाकण्यात आली. यासाठी जेसीबीचे सहाय्य घेण्यात आले. दोन ग्रामपंचायत सदस्यांनी स्वखर्चातून या ठिकाणच्या धोकादायक रस्त्याची दुऊस्ती करण्यात आली असल्यामुळे विनायक पाटील व वसंत सांबरेकर यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. श्र्रमदानाने रस्ता करण्यासाठी ग्रामपंचायत माजी सदस्य मनोहर सांबरेकर, बसवंत सांबरेकर, बाळू तारीहाळकर, विजय सावंत, नामदेव पाटील आदींनी परिश्र्रम घेतले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article