हिंदवाडी घुमटमाळ मारुती मंदिरासमोरील पथदीपांची दुरुस्ती
बेळगाव : हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर परिसरातील पथदीप गेल्या अनेक महिन्यांपासून बंद स्थितीत होते. सदर मंदिर अत्यंत प्राचीन असून, या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, पथदीपांऐवजी रात्रीच्या वेळी मंदिराकडे येणाऱ्या भाविकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेत नगरसेवक नितीन जाधव यांनी बंद स्थितीत असलेले हायमास्ट व पथदीप सुरू केले आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवासी व भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. मनपाच्या प्रभाग क्र. 29 मध्ये येणाऱ्या हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर परिसरातील हायमास्ट व पथदीप गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत होते. सदर मंदिर प्राचिन काळापासूनचे असल्याने दर शनिवारी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. रात्रीच्या वेळी स्थानिक रहिवासी व भक्तांना अंधारातून वाट शोधावी लागत होती. ही समस्या लक्षात घेत नगरसेवक नितीन जाधव यांनी पाठपुरावा करून हायमास्ट व पथदीप दुरुस्त केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.