भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन
वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे आज सायंकाळी 6 वाजून 38 मिनिटांनी निधन झाले. बेनेगल किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते. त्यांची मुलगी पिया बेनेगल यांनी दिग्दर्शकांच्या निधनाची माहिती एबीपी न्यूजला दिली आहे. श्याम बेनेगल यांच्या निधनाचे वृत्त खरे आहे, असं पियाने सांगितलं.
मुंबई सेंट्रल येथील व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये (23 डिसेंबर) सायंकाळी 6.38 वाजता त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. पिया बेनेगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम बेनेगल गेल्या अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. ते या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. आज उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून त्यांचे दररोज घरी डायलिसिस केले जायचे, अशी माहिती एका मुलाखतीत स्वत: श्याम बेनेगल यांनी दिली होती.
श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांना 8 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. ‘झुबैदा‘, ‘द मेकिंग ऑफ द महात्मा‘, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो‘, ‘मंडी‘, ‘आरोहण‘, ‘वेलकम टू सज्जनपूर‘, ‘अंकुर‘, ‘निशांत‘, ‘मंथन‘, ‘भूमिका‘, ‘जुनून‘ यांसारखे डझनभर उत्तम चित्रपट त्यांनी केले आहेत. शायन बगेनल यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे. श्याम बेनेगल यांनी त्यांच्या फिल्मी करियरमध्ये 24 चित्रपट, 45 डॉक्यूमेंट्री आणि 1500 ?ड फिल्म्सही बनवले आहेत. 1976 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर 1991 मध्ये श्याम बेनेगल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
श्याम बेनेगल यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रातही अभ्यास केला आहे. त्यांनी सर्वात आधी अर्थशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांना फोटोग्राफीची खूप आवड होती. जेव्हा ते 12 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी त्यांचे वडील श्रीधर बी. बेनेगल यांच्यासाठी कॅमेरावर पहिला चित्रपट बनवला