संगीत, साहित्य, अभिनय क्षेत्रातील नामवंत कलाकार आजपासून बेळगावात
बेळगाव : सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या बेळगावमध्ये या आठवड्यात अनेक मान्यवर दाखल होणार आहेत. संगीत, साहित्य, अभिनय अशा क्षेत्रातील नामवंत मंडळी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने बेळगावला येत आहेत. येथील आनंद इन्फ्रास्ट्रक्चर या आनंद अकनोजी यांच्या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेते शशांक केतकर हे शुक्रवार दि. 5 रोजी बेळगावला येत आहेत. दि. 4 सप्टेंबर म्हणजेच गुरुवारी आर्ट्स सर्कलतर्फे ‘शब्दसुरांचं लेणं’ हा कार्यक्रम रामनाथ मंगल कार्यालयामध्ये होत आहे. या कार्यक्रमासाठी अभिनेते व सूत्रसंचालक विघ्नेश जोशी तसेच गायक धनंजय म्हसकर व गायिका केतकी चैतन्य बेळगावला येत आहेत. रविवार दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख हे सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्रमासाठी तसेच बेळगावच्या कवयित्री इंदिरा संत यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आयएमईआर येथे होत आहे. या कार्यक्रमाला अभिनेत्री व लेखिका मधुराणी बहुलकर व अभिनेत्री, लेखिका मुग्धा गोडबोले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी कल्याणी जोशी, ओंकार प्रभू घाटे हे गायक तसेच सचिन जगताप, केदार गुळवणी, प्रशांत देसाई आणि अनिकेत ससाणे हे वादक बेळगावला येत आहेत.