कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुप्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचे निधन

07:00 AM May 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘सन ऑफ सरदार’मुळे विशेष ओळख : वयाच्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

हिंदी चित्रपट विश्व आणि टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या दमदार अभिनयाने ओळख निर्माण करणारे अभिनेते मुकुल देव यांचे शनिवारी निधन झाले. ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘यमला पगला दीवाना’ यासारख्या चित्रपटांतून ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या अचानक निधनाने त्यांच्या प्रियजनांना धक्का बसला आहे. शनिवारी सायंकाळी दिल्लीतील दयानंद मुक्ती धाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुकुल देव यांनी 1996 च्या दस्तक चित्रपटातून सुष्मिता सेनबरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी अजय देवगणबरोबर ‘सन ऑफ सरदार’, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘कोहराम’ आणि सलमान खानबरोबर ‘जय हो’ यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटातून भूमिका साकारल्या. ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटात त्यांनी टोनी सिंग संधूची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून त्यांना विशेष ओळख मिळाली. त्यांनी अनेक पंजाबी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केले. शरीक या पंजाबी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. 25 जुलै 2025 रोजी रिलीज होत असलेल्या अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटात मुकुल राय यांनी काम केलंय. त्यांचा हा अखेरचा चित्रपट ठरणार आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी

मुकुल देव यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1970 रोजी दिल्ली इथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे पंजाबमधील जालंधर येथील असले तरी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दिल्लीत स्थायिक झाले होते. त्यांचे वडील हरी देव हे सहाय्यक पोलीस आयुक्त होते. तर त्यांचा भाऊ राहुल देव हा देखील सर्वपरिचित अभिनेता आहे. मुकुल देव हे अभिनेते राहुल देव यांचे धाकटे भाऊ होते. राहुल यांनीच सोशल मीडियावर काल रात्री आपला भाऊ मुकुल देव यांनी नवी दिल्लीत अखेरचा श्वास घेतल्याची माहिती सर्वदूर केली. मुकुल यांना सिया देव नावाची एक मुलगी आहे.

वैमानिक पायलट म्हणूनही ओळख

मुकुल देव हे अभिनयाव्यतिरिक्त रायबरेली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अकादमीचे प्रशिक्षित पायलट होते. त्यांनी जवळजवळ एक दशक व्यावसायिक पायलट म्हणून काम केले आहे. त्यांनी अभिनय कारकिर्दीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यापूर्वी त्याने एक वैमानिक प्रशिक्षण संस्था देखील चालवली होती. तसेच ते हिंदी, पंजाबी आणि दक्षिण चित्रपटांमध्ये तसेच टेलिव्हिजन जगतातही सक्रिय होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article