For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसजीपीडीए मासळी मार्केटचे लवकरच नूतनीकरण

12:57 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
एसजीपीडीए मासळी मार्केटचे लवकरच नूतनीकरण
Advertisement

मडगाव : मडगाव एसजीपीडीएच्या किरकोळ मासळी मार्केटाची यापूर्वी लाखो ऊपये खर्च करून दुऊस्ती करण्यात आली होती. त्यावेळी हे मार्केट दुबईच्या धर्तीवरचे मार्केट झाल्याचा दावा करून मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्याच मार्केटाची आता पुन्हा एकदा दुऊस्ती केली जाणार असल्याची माहिती एसजीपीडीएचे अध्यक्ष कृष्णा उर्फ दाजी साळकर यांनी दिली आहे. एसजीपीडीएच्या किरकोळ मासळी मार्केटाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्याचा निर्णय एसजीपीडीए मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर मासळी मार्केट विक्रेत्यांकडे चर्चा करून सोपो शुल्क रक्कम ठरविण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला अशी माहिती दाजी साळकर यांनी दिली. या बैठकीला मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई तसेच इतरांची उपस्थिती होती.

Advertisement

घाऊक मासळी मार्केटाचे काम सुरू असून एका बाजूचे काम पुर्णत्वाकडे आहे तर दुसऱ्या बाजूचे काम सुरू आहे. घाऊक मासळी मार्केट तात्पुरते स्थलांतरीत करून मार्केट बांधणीच्या कामाला गतीने चालना देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, मार्केट स्थलांतरास विक्रेत्यांकडून विरोध होऊ लागल्याने हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. एक भाग पूर्ण झाला त्याठिकाणी घाऊक मासळी मार्केट स्थलांतरीत केले तर दुसऱ्या बाजूला काम करणे कठीण होणार असल्याने हा पर्याय सुद्धा मार्गी लागू शकलेला नाही. सद्या आहे, त्यापरिस्थितीच कामपुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

घाऊक मासळी मार्केटमध्ये अवजड वाहनांसाठी 500 ऊ. शुल्क आकारले जाते. पण, आता काही विक्रेते आठ, दहा ते सोळा चाकांचे सुद्धा मोठे ट्रक आणतात, अशा अवजड वाहनांसाठी 800 ते 1000 ऊ. शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतल्याचे साळकर यांनी सांगितले. घाऊक मासळी मार्केटमध्ये सोपो शुल्क गोळा करण्यासाठी नव्याने निविदा आगामी विधानसभा अधिवेशनापूर्वी जाहीर केल्या जातील. एसजीपीडीएच्या मैदानावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मैदानावर फेस्ताची फेरी भरली जाते, ती जागा फेस्ताच्या वेळी फेरी भरविण्यासाठी उलपब्ध करून दिली जाणार असल्याचे दाजी साळकर यांनी सांगितले.

Advertisement

किती महसूल अपेक्षित आहे हे अगोदर ठरवा!

सोपो शुल्कातून एसजीपीडीएला कंत्राटदारांकडून नेमका किती महसूल अपेक्षित आहे हे अगोदर ठरविले पाहिजे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या म्हणण्यानुसार महिन्याला 50 लाख व वर्षाला सहा कोटी येणे आवश्यक आहे. मात्र हे वस्तुस्थितीत बसत नाही. त्याचबरोबर निवेदेतील अटी शिथिल केल्या पाहिजेत, असे आमदार विजय सरदेसाई प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. एसजीपीडीए मैदानावरील पे पार्किंगसाठी शुल्क लोकांना परवडेल असेच ठेवावे. 28 किंवा 29 जून रोजी पुन्हा बैठक होईल, त्यावर अधिक चर्चा होईल असे सरदेसाई म्हणाले.

Advertisement
Tags :

.