महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खासगी जागेतील ती पाईप लाईन हटवा

10:19 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शिवाजीनगर येथील पाचव्या गल्लीमध्ये खासगी जागेतच पाण्याची पाईप लाईन घालण्यात आली आहे. बऱ्याच वर्षांपासून ही पाईप लाईन आहे. ती काढून बाजुला घालण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र त्याकडे एल अॅण्ड टी कंपनीकडे दुर्लक्ष केले असून त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देवून ती पाईप लाईन हटविण्याची सूचना एल अॅण्ड टी कंपनीला करावी,अशी मागणी करण्यात आली. शिवाजीनगर येथील पेट्रोल पंप शेजारीच परशराम गंगाधर गरडे यांचे घर आहे. तसेच खुली जागा आहे. त्यामधूनच ही पाईप लाईन गेली आहे. बऱ्याचवेळा पाईपलाईन फुटून पाणीदेखील घरामध्ये शिरते. त्यानंतर दुरुस्ती केली जाते. मात्र पुन्हा पाण्याची पाईप फुटून नुकसान होत आहे. तेंव्हा तातडीने आपल्या खासगी जागेतील पाईप लाईन बाजुला काढावी, अशी मागणी त्यांनी केली. केयुडब्ल्युएस यांनी ही पाईप लाईन घातली आहे. बऱ्याच वर्षांपासून ही पाईप लाईन असली तरी ती जागेतून हटवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article