For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री सुदिन ढवळीकरांना मंत्रीपदावरून हटवा

12:44 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंत्री सुदिन ढवळीकरांना मंत्रीपदावरून हटवा
Advertisement

फोंडा : लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून भाजपा उमेदवार पल्लवी धेंपो यांना पुरेशी आघाडी मिळवून देण्यात भाजपा कार्यकर्तेच कमी पडल्याचे विधान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी करून निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांचा अपमान केला आहे. मडकई भाजपा मंडळाने याचा निषेध केला आहे. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी राज्यातील संपूर्ण भाजपा कार्यकर्त्यांच्या खच्चीकरणाचा डाव आखलेला आहे. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी कारवाई करताना सरकारचा घटक असलेल्या मगो पक्षाचे मंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रीपदावरून काढून टाकावे, अशी मागणी मडकई भाजपा मंडळाने केली आहे. फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मडकई भाजपा मंडळाचे सुदेश भिंगी, प्रशांत नाईक, दिनेश वळवईकर, जयराज नाईक, संतोष रामनाथकर, सुभाष गावडे आदी उपस्थित होते.

Advertisement

विधानसभेत 18000 तरीही लोकसभेसाठी केवळ 14733 मते 

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 10681 मते तर काँग्रेसच्या सार्दिन यांना 9448 मते मिळाली होते. यावेळी सुदिन ढवळीकर यांनी सार्दिनच्या प्रत्येक प्रचारसभेत हजेरी लावली होती. तरीही भाजपाला 1233 मतांची आघाडी मडकई मतदारसंघात प्राप्त झाली होती. सन 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मगोला 13963 मते तर भाजपाला 4000 मते मिळाली होती. म्हणजेच भाजप व मगो युती झाल्यानंतर सुमारे 18000 मते अपेक्षित होती. मात्र यंदाच्या सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाबरोबरच एनडीएचा घटक पक्ष म्हणून मगोने मते मिळवण्यासाठी कंबर कसणे जरूरीचे होते. सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत युतीमुळे अपेक्षित असलेली 18000 मतांची आघाडी मिळवून देण्यात अपयशी ठरले. भाजपाला केवळ 14722 मते मिळाली म्हणजेच सुमारे 4000 मते कमी पडली. यावर मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आधी चिंतन करावे, मडकईत मते कुठे कमी पडली याचा आधी शोध घ्यावा त्यानंतरच दक्षिण गोव्यात भाजपाचे कार्यकर्ते कमी पडले हा आरोप करावा.

Advertisement

Advertisement
Tags :

.