For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काकतीमधील गंगेकोळ नाल्यावरील अतिक्रमणे हटवा!

10:27 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
काकतीमधील गंगेकोळ नाल्यावरील अतिक्रमणे हटवा
Advertisement

नाल्यावरती दहा फूट सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्याची मागणी : ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन : उन्हाळ्यातही या भागातील विहिरींना पाणी

Advertisement

वार्ताहर /काकती

काकती ग्रामपंचायत गावातील गंगेकोळ नाल्यावरती तीन फूट गटार बांधत आहे. परिणामी उरलेल्या शिल्लक जागेत समोरील घरमालकाची नाल्यावरील अतिक्रमणे हटवावीत. तर जुन्या गावात या नाल्यावरती सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी काकती ग्रामपंचायतीला सादर केले. मूक बसवन्नकोळ या जंगल टेकडीवरून येणाऱ्या गंगेकोळ नाल्यावरती तीन फूट गटार ग्रामपंचायत बांधत आहे. यामुळे समोरील घरमालकाची या सरकारी जागेत अतिक्रमणे झाली आहेत. तसेच करगुप्पीकर परिवाराच्या पाठीमागील व मठ गल्लीच्या पाठीमागील नाल्याच्या जागेत किमान पाच फूट नाला बांधून त्यावरती सिमेंट काँक्रीटचा दहा फुटाचा रस्ता करण्यात यावा. यामुळे येथील शेतकऱ्यांना गुराचा चारा बैलगाडी, टॅक्टरमधून या रस्त्यावरून घरी आणता येतो. तसेच हा रस्ता देखील पंधरा फुटाचा आहे. या निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत. निवेदनाचा स्विकार ग्रा. पं.अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, उपाध्यक्षा रेणुका कोळी, पीडीओ अरुण नाथबुवा यांनी या नाल्याच्या कामकाजासाठी सर्व्हे कमिटी स्थापन करून निवेदनाप्रमाणे अंमलबजावणीचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात भारत करगुप्पीकर, लक्ष्मण पाटील, सिद्राई बेडका, नागो बाजरेकर, रेवाणी पवार, बाळू कंग्राळकर, मोहन कंग्राळकर, गणपत सुरेकर, सिदाप्पा कुरबर आदिंचा सहभाग होता.

Advertisement

नाल्यात नैसर्गिक झरे

पावसाळ्यात याच नाल्यातून पावसाचे पाणी वाहत येते. हिवाळ्यात देखील पाणी जमिनीत मुरल्याने येथील विहिरींना उन्हाळ्यात देखील पाणी असते. नाल्यात अनेक ठिकाणी नैसर्गिक झरे वाहतात. यांचा गांभीर्याने विचार करून अंमलबजावणी करावी. नाल्यावरील अतिक्रमणे हटवावीत, असे निवेदनात म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.