कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहर-उपनगरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यास सुरुवात

12:49 PM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रेल्वेस्टेशन रोडवर ठेवली बाकडे, भवानीनगरात दंडात्मक कारवाई

Advertisement

बेळगाव : शहर व उपनगरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासह ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणचा कचरा काढून त्या ठिकाणी बाकडे ठेवले जात आहेत. स्टेशन रोडवरील ब्लॅकस्पॉट नुकताच हटविला असून त्या ठिकाणी बसण्यासाठी आकर्षक बाकडे ठेवली आहेत. तसेच मंडोळी रोडवरही अंडरग्राऊंड डस्टबिनमध्ये कचरा टाकण्याऐवजी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहर स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील एका ठेकेदाराला देण्यात आला असून, त्याच्याकडून महापालिका व बेळगावकरांना अपेक्षा होती.

Advertisement

मात्र, सध्याचे चित्र पाहता बेळगावकरांचा अपेक्षाभंग होत आहेत. घरोघरी येणारी घंटागाडी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच नागरिक घरातील कचरा रस्त्याच्या कडेला फेकून देत आहेत. बेळगाव महापालिकेचे नगरसेवक इंदूर दौऱ्यावर जाऊन आल्यापासून बेळगावातही त्यांच्याकडून वेगवेगळे प्रयोग राबविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांकडून शहरातील कचऱ्याची उचल होत आहे. मात्र, नागरिकांकडूनही तितकेच सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. सातत्याने ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण त्याला अद्यापही म्हणावे तसे यश येताना दिसत नाही.

पाटील गल्लीत मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आहेत. त्यांच्याकडून रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला कचरा फेकून दिला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करून ब्लॅकस्पॉट हटविण्यास सांगितले आहे. त्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाकडे व शोभेची झाडे ठेवण्यात आली आहेत. तसेच भवानीनगर परिसरात अंडरग्राऊंड डस्टबिन आहेत. त्यामध्ये कचरा टाकण्याऐवजी उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे महापालिकेकडून सीसी कॅमेऱ्यात कैद झालेल्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article